शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

साश्रू नयनांनी जवान दुबे यांना निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 23:53 IST

सोनपेठ : तालुक्यातील डिघोळ येथील जवान छोटूलाल दुबे यांच्या पार्थिवावर २७ जुलै रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या घरापासून स्मशानभूमीपर्यंत फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टरमधून अंत्ययात्रा काढण्यात आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ : तालुक्यातील डिघोळ येथील जवान छोटूलाल दुबे यांच्या पार्थिवावर २७ जुलै रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या घरापासून स्मशानभूमीपर्यंत फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टरमधून अंत्ययात्रा काढण्यात आली होती.सोनपेठ तालुक्यातील डिघोळ येथील छोटूलाल दुबे (वय ४६) हे जम्मू काश्मिरमधील श्रीनगर येथे १०१ मराठा लाईट इन्फंट्रीच्या तुकडीमध्ये सुभेदार या पदावर कार्यरत होते. दोन दिवसांपूर्वी दुबे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने दिल्लीतील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान २६ जुलै रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. गुरुवारी छोटूलाल दुबे यांचे पार्थिव सोनपेठ तालुक्यातील डिघोळ या मूळ गावी आणण्यात आले.यावेळी परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. दुबे यांची पत्नी, आई, वडील, भाऊ, मुलगा व नातेवाईकांनी अंतिम दर्शन घेतले. त्यानंतर फुलांनी सजविलेल्या एका ट्रॅक्टरमध्ये जवान दुबे यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. त्यांच्या घरापासून स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. ‘जवान छोटूलाल दुबे अमर रहे’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी दोन्ही बाजुंनी ग्रामस्थांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. जवान दुबे यांचा मोठा मुलगा ऋषिकेश याने अग्नी दिला. यावेळी माजी जि.प. अध्यक्ष राजेश विटेकर, उपजिल्हाधिकारी चुन्नीलाल कोकणी, तहसीलदार जीवराज डापकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख मधुकर निरपणे, शिवाजी मव्हाळे, रंगनाथ सोळंके, केशव भोसले, गोपाळ भोसले, रमेश इंदूरकर, उत्तमराव शिंदे आदींची उपस्थिती होती.