शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत रियान इंटरनॅशनल ठरले ‘चॅम्पीयन’

By admin | Updated: February 22, 2016 00:20 IST

जालना : लोकमत टाईम्स कॅम्पस क्लब आयोजित आणि अनिल जिंदल वर्ल्ड स्कूल व समर्थ स्पोर्टस अ‍ॅण्ड म्युझिकल प्रायोजित आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद रियान इंटरनॅशनल स्कूलने पटकावले

जालना : लोकमत टाईम्स कॅम्पस क्लब आयोजित आणि अनिल जिंदल वर्ल्ड स्कूल व समर्थ स्पोर्टस अ‍ॅण्ड म्युझिकल प्रायोजित आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद रियान इंटरनॅशनल स्कूलने पटकावले. याशिवाय गोल्डन ज्युबिली संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले तर अनिल जिंदल वर्ल्ड स्कूलने स्पर्धेत तिसरे स्थान पटकावून यजमान पदाची शान राखली.तत्पूर्वी सकाळच्या सत्रात मुलींचा प्रदर्शनीय क्रिकेटचा सामना खेळविण्यात आला. एमआरडीए आणि एम.एस.जैन विद्यालया दरम्यान झालेल्या या सामन्यात एमआरडीएच्या मुलींच्या संघाने बाजी मारली. सहा षटकांत एमआरडी ने ५१ धावा तडकावल्या. प्रत्युत्तरात एम. एस. जैनचा संघ ३७ धावातच गारद झाला. त्यानंतर दामिनी पथकाच्या प्रमुख सीमा घुगे यांनी अंतिम सामन्यासाठी नाणेफेक केला. गोल्डन ज्युबिली आणि रियान इंटरनॅशनलच्या संघामध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात गोल्डन ज्युबिलीने प्रथम फलंदाजी करताना १० षटकात ६६ धावा केल्या. प्रत्युत्तरात रियान इंटरनॅशनलने हे लक्ष सहज पार करत चॅम्पियनशीपवर आपले नाव कोरले. या सामन्यात नितीन शेळकेने मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करून संघाला विजय मिळवून दिला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून दामिनी पथकाच्या सीमा घुगे, गोल्डन ज्युबिलीचे प्राचार्य श्री.पी. सुरेश व जिंदल ग्रुपचे निखील जिंदल उपस्थित होते.कार्यक्रमाला लोकमत जालनाचे शाखा व्यवस्थापक मोहित पवार उपस्थित होते. चार दिवस चाललेल्या या स्पर्धेसाठी ग्राउंड मेंटेंनसचे काम नीलेश पैठणे यांनी पाहिले. तर सचिन गिरी यांनी कार्यवाहकाची भूमिका पार पाडली. अनिल जिंदल वर्ल्ड स्कूलचे प्राचार्य प्रवीण झीर यांनी ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी सहकार्य केले. पंच म्हणून सीमा पवार, प्रियंका दायमा, सुप्रिया सोनवणे, रूषी गरड आणि पवन ठाकूर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रायोजक समर्थ म्युझिकल स्पोर्टस अ‍ॅण्ड फिटनेस आणि अनिल जिंदल वर्ल्ड स्कूल होते.