शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रशियन स्टील कंपनीच्या प्लांट उभारणीला सुुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:27 IST

औरंगाबाद : दिवाळीचा मुहूर्त साधत ‘नोव्होलिपेत्सक स्टील’ (एनएलएमके) या रशियातील सर्वात मोठ्या स्टील उद्योगाने ‘ऑरिक सिटी’मध्ये प्लांट उभारणीच्या कामाला ...

औरंगाबाद : दिवाळीचा मुहूर्त साधत ‘नोव्होलिपेत्सक स्टील’ (एनएलएमके) या रशियातील सर्वात मोठ्या स्टील उद्योगाने ‘ऑरिक सिटी’मध्ये प्लांट उभारणीच्या कामाला सुरुवात केली आहे. ही बहुराष्ट्रीय कंपनी दोन टप्प्यांत तब्बल ५ हजार ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक औरंगाबादेत करणार आहे.

करमाड रेल्वेस्टेशनच्या अलीकडे ऑरिक सिटीलगत सुमारे ४३ एकरवर (१ लाख ७७ हजार ५३७ चौरस मीटर) हा प्रकल्प उभारला जाणार आहे. ‘एनएलएमके’ ही कंपनी ट्रान्सफॉर्मरसाठी लागणारे विशेष स्टील तयार करते. भारतासह जगभरातील ३०-४० देशांत ही कंपनी स्टीलचा पुरवठा करते. या कंपनीच्या माध्यमातून सुमारे दीड हजार स्थानिकांना रोजगार मिळेल, तसेच निर्यातीलाही चालना मिळणार आहे. जागा ताब्यात घेऊन लगेच उद्योगाची पायाभरणी करण्यासाठी या उद्योगाच्या लेखा व आयटी विभागाचे प्रमुख राकेशकुमार श्रीवास्तव, तसेच एक रशियन प्रतिनिधी औरंगाबादेत आले. त्यांनी ५ नोव्हेंबर रोजी ‘ऑरिक’लगतच्या जागेचा ताबा घेतला. त्यानंतर या उद्योगाच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट टीममार्फत प्रत्यक्ष प्लांट उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे.

ऑगस्ट महिन्यामध्ये ‘एनएलएमके’च्या रशियातील मुख्य कार्यालयातून जागेचा ताबा घेऊन लगेच प्लांट उभारणीच्या कामाला सुरुवात करता येईल का, अशी विचारणा ''''एमआयडीसी''''चे तत्कालीन सहमुख्य कार्यकारी अधिकारी, तथा ''''ऑरिक''''चे व्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव यांच्याकडे मेलद्वारे विचारणा केली होती. औरंगाबादेतील कोरोनाची सद्य:स्थिती कशी आहे. लॉकडाऊनची स्थिती कशी आहे. प्लांट उभारणीसाठी बांधकाम मजूर उपलब्ध होतील का. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, राज्य, तसेच केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांबाबत विचारणा करण्यात आली होती. तेव्हा कैलास जाधव यांनी या उद्योगाच्या रशियातील व्यवस्थापकीय संचालकांना तात्काळ उत्तर दिले व सप्टेंबर महिना किंवा त्यानंतर कधीही औरंगाबादेत येऊन ताबा घेऊ शकता व लगेच बांधकामालाही सुरुवात करता येईल, असे कळविले होते.

चौकट.....

‘आरबी’ समूहाचीही तयारी

घर, बाथरूम, कपडे स्वच्छ करण्यासाठी लागणारे हार्पिक, लायसॉल, डेटॉल, वनिश, फिनिश आदी आंतरराष्ट्रीय दर्जाची उत्पादने तयार करणाऱ्या रेकीट बेंकिजर (आरबी) या उद्योग समूहाने औरंगाबादेत कंपनी सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, केंद्र व राज्य शासनाकडून मिळणाऱ्या सवलतीबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्यामुळे या कंपनीचा सामंजस्य करार तूर्तास थांबला आहे.