मंठा : देऊळगावराजा येथील खडकपूर्णा धरणातून तळणीपर्यंतच्या गावांना पाणी सोडण्यासाठी शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन गुरूवारी करण्यात आले. या रास्ता रोकोमध्ये परिसरातील महिलांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मंठा - लोणार रस्त्यावर पूर्णा पाटीवर भर उन्हात रास्ता रोक ो आंदोलन केले. दोन तास दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली होती. तळणीसह देवठाणा, उस्वद, कानडी, ल्ािंबखेडा, इंचा, दुधा, सासखेडा, टाकाळखोपा, किर्ला, हनवतखेडा, वाघाळा, चिखली ,जांभरूण,कोकरसा, दहा, तुपा, किर्ला, भुवन या गावांना नदीपात्रातून पाणी पुरवठा होत होता. मात्र, डिसेंबरमध्ये पूर्णा नदी कोरडी पडली आहे. परिसरातील तलाव व विहिरींनी तळ गाठला आहे. यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. महिलांसह मुलांना पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे. जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. देऊळगावराजा येथील खडक खकडपूर्णा धरणातून पाण्यासाठी जि. प. सदस्या उषाताई उध्दवराव पवार व ज्ञानेश्वर राठोड यांनी ३० डिसेंबर रोजी प्रशासनाकडे लेखी निवेदन देऊन पाणी सोडण्याची मागणी के ली होती. त्यानंतर १८ ते २२ जानेवारीपर्यंत महिलांसह परूषांनी पाच दिवस थेट पूर्णा नदीच्या पात्रात बेमुदत उपोषण केले होते. यावेळी पाणी सोडण्यात येईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले. पाणी आले नाही. मध्यंतरी खडक पूर्णाचे पाणी सुटले होते. मात्र, ते वझर सरकटेपर्यंत पाणी आल्याने निराश झालेल्या उपोषणकर्त्यांनी गुरवारी सकाळी ११:३० ते १२:३० दरम्यान महिला हंडे घेऊन रस्त्यावर बसल्या होत्या. यावेळी तहसीलदार एल.डी सोनवणे यांनी भेट देऊन म्हणणे जाणून घेतले. वरिष्ठांना आपल्या भावना कळवून पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. त्यानंतर रास्ता रोक ो मागे घेण्यात आला. यावेळी जि. प.सदस्या उषाताई पवार, तालुक ा उपप्रमुख ज्ञानेश्वर सरकटे, उध्दवराव पवार, सभापती सुरेश सरोदे, पं. स. सदस्य विश्वनाथ हनवते, विभाग प्रमुख बबन शेळके , सामाजिक कार्यकर्ते कैलास खंदारे, सरपंच विष्णू चाटे, ज्ञानेश्वर राठोड, संतोष कांगणे, अशोक राठोेड, राजू वाघ, बाळु देशमुख, अशोक सांगळे, सुमनबाई राठोड, जनाबाई राठोड, शितावाई चव्हाण यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
पाण्यासाठी ग्रामस्थ रस्त्यावर
By admin | Updated: April 22, 2016 00:26 IST