शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत ग्रामीण बँक कर्मचारी एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:33 IST

विविध प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामीण बँकेचे अधिकारी व कर्मचाºयांनी मंगळवारी सिडकोतील ग्रामीण बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन केले. यावेळी जोरदार निदर्शनेही करण्यात आली. या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर १५ दिवसांनंतर पुन्हा आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला.

ठळक मुद्देआंदोलन : विविध प्रलंबित मागण्यांसाठी जोरदार निदर्शने; अनुकंपाची भरती पुन्हा चालू करा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : विविध प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामीण बँकेचे अधिकारी व कर्मचाºयांनी मंगळवारी सिडकोतील ग्रामीण बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन केले. यावेळी जोरदार निदर्शनेही करण्यात आली. या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर १५ दिवसांनंतर पुन्हा आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला.ग्रामीण, बँकेतील अधिकारी, कर्मचारी यांना पेन्शन योजना लागू करावी,भविष्य निर्वाह निधीची कपात करताना कोणतीही मर्यादा असू नये, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र ग्रामीण बँक अधिकारी व कर्मचारी संघटनेतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. मुख्य कार्यालयासमोर टाकलेल्या मंडपात सर्वजण दिवसभर बसून होते.कर्मचारी संघटनेचे सुनील कुलकर्णी यांनी सांगितले की, सर्व अधिकारी व कर्मचारी यांना संगणक वेतनवाढ व एफपीपी देण्यात यावे, अनुकंपा धर्तीवरील भरती पुन्हा चालू करावी, राष्ट्रीय ग्रामीण बँकेची स्थापना करण्यात यावी, पुरस्कृत बँकेप्रमाणे सर्व भत्ते व सवलती पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात याव्यात, बढती व भरती प्रक्रिया पुरस्कृत बँकेप्रमाणेच लागू कराव्यात, रोजंदारीवरील संदेशवाहकांना बँकेच्या सेवेत कायम करावे. मित्रा कमिटी व बदली धोरण बरखास्त करण्यात यावे व सर्व ग्रामीण बँकांना १० व्या वेतन कराराची समान अंमलबजावणी करण्यात यावी. या मागण्यांचा समावेश आहे....तर पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णयअधिकारी संघटनेचे किशोर सावरगावकर यांनी सांगितले की, व्यवस्थापनाने लीज डीड अ‍ॅग्रिमेंटमध्ये समानता ठेवावी, तसेच कोणतीही सवलत किंवा भत्ता देत असताना त्यामध्ये समानता असावी, ही सुद्धा आमची मागणी आहे; पण व्यवस्थापन याविषयी सकारात्मक दृष्टिकोनातून बघताना दिसून येत नाही. यामुळे धरणे आंदोलन करावे लागले. येत्या १५ दिवसांच्या काळात मागण्यांवर सकारात्मक विचार झाला नाही, तर पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय सर्वांनी घेतला आहे. यावेळी सुरेश दासरवाड, महेश मगर, दिलीप कड, मुकुंद वसेकर यांच्यासह सर्व कर्मचारी, अधिकारी हजर होते.