शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात आढळले २० टक्के दूषित पाणी

By admin | Updated: August 12, 2014 01:57 IST

जालना : जिल्ह्यात ग्रामीण भागात २० टक्के पिण्याचे पाणी दूषित असल्याची कबूली जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली असून याबाबत संबंधित ग्रामपंचायतींना

जालना : जिल्ह्यात ग्रामीण भागात २० टक्के पिण्याचे पाणी दूषित असल्याची कबूली जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली असून याबाबत संबंधित ग्रामपंचायतींना दूषित पाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष काळजी घेण्याची सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, ग्रामीण भागात साथीचे आजार नसल्याचा दावाही जि.प. आरोग्य विभागाकडून सोमवारी करण्यात आला.‘लोकमत’ ने ग्रामीण भागातील दूषित पाणीपुरवठ्यासंबंधीचे सर्वेक्षण शनिवारी केले होते. या सर्वेक्षणाचे वृत्त रविवारच्या अंकातून प्रसिध्द झाल्यानंतर आरोग्य विभागाला जाग आली. त्यानंतर ग्रामपंचायतींना ही सूचना करण्यात आली.ग्रामीण भागात पावसाळ्यात पाणी दूषित होण्याचे प्रमाण अधिक असते. यामुळे जिल्ह्यात बहुतांश गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. विशेष म्हणजे जि.प.चे कर्मचारी हे मुख्यालयाच्या ठिकाणी रहात नसल्याने गावाला पाणीपुरवठा होणाऱ्या योजनेमध्ये ब्लिचिंग पावडरचा वापर होतो की नाही याकडे कोणाचेही लक्ष नाही. अनेक जलवाहिनी फुटलेल्या आहेत. त्यामुळे नालीचे पाणी त्याद्वारे नळाना येते. अनेक ठिकाणी जलवाहिनी देखील कालबाह्य झालेली आहे. त्यामुळे जलवाहिनीला सतत गळती लागते. जलशुद्धीकरण यंत्र बंद असल्याचे प्रकारही काही ठिकाणी आढळून आले. काही ठिकाणी वेळेवर वीजपुरवठा होत नसल्याने गावात नियमित पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे कुपनलिकांमधील पाणी ग्रामस्थांना घ्यावे लागते. अशा कुपनलिकांभोवती घाणीचे साम्राज्य, गटारेही असतात. त्यामुळे हे पाणीही दूषित असते. जिल्ह्यात गोदाकाठावर सुमारे ४० गावांमध्ये तर बारा महिने दूषित पाणी असते. मात्र याकडेही आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असल्याचे जाणवते. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही.पी. भटकर यांना विचारणा केली असता ग्रामीण भागात २० टक्के दूषित पाणी असल्याचे त्यांनी सांगितले. गावात सार्वजनिक पाणीपुरवठा करताना पाण्याचे शुद्धीकरण करावे, त्यासाठी आवश्यक ब्लिचिंग साठा अगोदरच उपलब्ध ठेवावा, कुठे गटार, घाणीचे साम्राज्य असल्यास तेथे साफसफाई करावी, अशी सूचना आरोग्य विभागासह संबंधित ग्रामपंचायतींना करण्यात आल्याचे डॉ. भटकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)