शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सातबारासाठी धावपळ

By admin | Updated: June 24, 2017 23:40 IST

परभणी : आॅनलाईन सातबारा काढण्यासाठी शासनाच्या सातबारा पोर्टलची गती धिमी झाल्याने शेतकऱ्यांना नव्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : आॅनलाईन सातबारा काढण्यासाठी शासनाच्या सातबारा पोर्टलची गती धिमी झाल्याने शेतकऱ्यांना नव्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. एक सातबारा काढण्यासाठी ३ ते ४ तासांचा वेळ लागत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. राज्य शासनाने महसूल विभागाचा कारभारही आता आॅनलार्इंन केला आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या सातबारा आॅनलार्इंन तयार करण्यात आल्या आहेत.एखाद्या शेतकऱ्याला सातबारा हवी असल्यास महा ई- सेवा केंद्रावर जावून सातबारा काढावी लागते. त्यानंतर तहसीलदारांची स्वाक्षरी घेऊन ही सातबारा शासकीय कामकाजासाठी ग्राह्य धरली जाते. सध्या खरीप पेरण्यांचे दिवस आहेत. शेतकऱ्यांना पैशांची अडचण भासत असून पेरण्यांसाठी पीककर्ज काढण्याची धावपळ सुरु आहे. राज्य शासनाने पीककर्जासाठी तातडीची मदत म्हणून १० हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे. किचकट अटी आणि शर्थींचे पालन केल्यानंतरही अडचणी संपत नाहीत. पीककर्ज काढण्यासाठी सातबारा आवश्यक आहे. परंतु, नेमकी हीच सातबारा शेतकऱ्यांना वेळेत मिळत नाही. परिणामी पीककर्ज काढताना तारेवरची कसरत कावी लागत आहे. परभणी जिल्ह्यामध्ये महा ई-सेवा केंद्रामार्फत आॅनलाईन सातबारा मिळतात. मात्र मागील एक महिन्यापासून ‘आपले सरकार’ या पोर्टलवरील सातबाराचे पोर्टल संथ गतीने चालत आहे. एक सातबारा काढण्यासाठी तीन ते चार तासांचा अवधी लागतो. त्यातच सातबारा काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. शासनाने या पोर्टलची गती वाढवावी आणि सर्वांना वेळेत सातबारा मिळेल, यासाठी प्रयत्न करावेत, अशी शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे.