शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

मॅरेथॉनमध्ये आज धावणार जालनेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 01:21 IST

येथील फनरनर फाऊंडेशनतर्फे जालन्यात प्रथमच आयोजित हाफ मॅरेथॉन स्पर्धेत रविवारी शेकडो जालनेकर धावणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील फनरनर फाऊंडेशनतर्फे जालन्यात प्रथमच आयोजित हाफ मॅरेथॉन स्पर्धेत रविवारी शेकडो जालनेकर धावणार आहेत. सकाळी साडेपाच वाजता मंठा चौफुली येथे स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा तीन गटांत होणार आहे. २१ किलोमीटरसाठी २५३ पुरुष व ३० महिलांनी, दहा किलोमीटरकरिता ३३४ पुरुष १७० महिला आणि पाच किलोमीटरसाठी ६८८ पुरुष आणि २७५ महिला सहभागी होणार आहेत. स्पर्धेला मंठा चौफुलीवरील कलश सीडसच्या मैदानावरून सुुरुवात होणार असून, सिंधीकाळेगाव येथे समारोप होणार आहे. यासाठी या मार्गावरील वाहतूक स्पर्धेच्या काळात इतरत्र वळविण्यात आली आहे.लोकमत महामॅरेथॉन नोंदणीला प्रतिसादस्पर्धेत सहभागी धावपटूंना शनिवारी कलश सीड्स येथे टी शर्ट, इलेक्ट्रॉनिक चीप व अन्य साहित्याचे वाटप करण्यात आले. या ठिकाणी लोकमतच्या वतीने आयोजित केल्या जाणा-या महामॅरेथॉन स्पर्धेबाबत माहिती देण्यासाठी लावण्यात आलेल्या स्टॉलला स्पर्धकांनी मोठ्या संख्येने भेट दिली. माजी. आ. कैलास गोरंट्याल यांनी लोकमत स्टॉलला भेट देऊन उपक्रमाची माहिती घेतली.जालना शहरासह बाहेरून आलेल्या अनेक स्पर्धकांनी या स्टॉलवर नाव नोंदणी करून लोकमत मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचे निश्चित केले. लोकमत मॅरेथॉनमध्ये सभागी होण्यासाठी लोकमतच्या भोकरदन नाक्यावरील लोकमत कार्यालयात तसेच महामॅरेथॉन डॉट कॉम या संकेत स्थळावर नोंदणी करता येणार आहे.