शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
4
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
5
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
6
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
7
Operation Sindoor : जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
8
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
9
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
10
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
11
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
12
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
13
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
14
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
15
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
16
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
17
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
18
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
19
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
20
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  

आसूड बैलांवर नव्हे, सरकारवर चालवा

By admin | Updated: April 15, 2017 00:28 IST

उस्मानाबाद :सरकारची मानसिकता ही शेतकऱ्यांच्या विरोधात असून, शेतकऱ्यांचा आसूड बैलावर नाही तर सरकारवर चालविला पाहिजे, असे प्रतिपादन आ़ बच्चू कडू यांनी केले़

उस्मानाबाद : कर्जमाफी केल्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाहीत, याची हमी मुख्यमंत्री मागत आहेत़ मात्र, नोकरदारांना सातवा वेतन आयोग लागू केल्यावर भ्रष्टाचार होणार नाही, याची हमी मुख्यमंत्र्यांनी दिली होती का ? असा सवाल करीत सरकारची मानसिकता ही शेतकऱ्यांच्या विरोधात असून, शेतकऱ्यांचा आसूड बैलावर नाही तर सरकारवर चालविला पाहिजे, असे प्रतिपादन आ़ बच्चू कडू यांनी केले़शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकरी, शेतमजूर, उद्योजक, दिव्यांग, विधवा आणि सैनिकांच्या हक्कासाठी ‘सीएम टू पीएम’ शेतकरी आसूड यात्रा काढण्यात आली आहे. सदरील यात्रा ११ एप्रिलपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरापासून सुरु करण्यात आली असून, २१ एप्रिल रोजी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात येथील वडनगर मधील घरावर जाणार आहे. ही यात्रा शुक्रवारी उस्मानाबाद शहरात दाखल झाली़ या यात्रेचे शहरात स्वागत करण्यात आले़ त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आ़ कडू बोलत होते़ यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, कार्याध्यक्ष कालिदास आपेट, मराठवाडा अध्यक्ष रामजीवन बोंदर, प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे, चंद्रकांत जाधव आदींची उपस्थिती होती़ आ़ कडू म्हणाले, राज्यात साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत़ ही साधी बाब नाही. सरकारची शेतकऱ्यांविषयींची मानसिकता काय आहे, हे तपासण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यापासून ते पंतप्रधानापर्यंत सर्वांना शेतकऱ्यांचे प्रश्न कळावेत, सरकार चालविणाऱ्यांना जाग आणण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करुन शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी ही आसूड यात्रा काढल्याचेही ते म्हणाले़ शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील म्हणाले, शेतकरी आत्महत्या करत आहेत. राज्यकर्त्यांना तरीही शरम नाही़ निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने वाऱ्यावर सोडली आहेत. हे शासन येवून तीन वर्षे झाली मात्र अधिकाऱ्यांच्या तोंडून नेते आजही बोलत आहेत. त्यामुळे या विरोधात ही आमची लढाई आहे. शासनाने शेतकरी, कष्टकरी जनतेचे प्रश्न नाही सोडविले तर ही जनता त्यांना गावात फिरकू देणार नाही, असे पाटील म्हणाले़ (प्रतिनिधी)