शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
2
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
3
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
4
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
5
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
6
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
7
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
8
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
9
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
10
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
11
Operation Sindoor Live Updates: हरियाणात मुसळधार पाऊस, पाहा व्हिडीओ
12
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
13
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
14
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
15
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
16
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
17
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
18
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
19
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
20
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी

‘रेमडेसिवीर’साठी राज्यभरातून औरंगाबादेत धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:02 IST

संतोष हिरेमठ औरंगाबाद : पुणे, नांदेडसह राज्यभरातील अनेक शहरांत रेमडसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, तेथील रुग्णांच्या नातेवाइकांकडून ...

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : पुणे, नांदेडसह राज्यभरातील अनेक शहरांत रेमडसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, तेथील रुग्णांच्या नातेवाइकांकडून इंजेक्शनची शोधाशोध सुरू आहे. औरंगाबादेत या इंजेक्शनचा मुबलक साठा आहे. त्यामुळे इंजेक्शनसाठी थेट औरंगाबादेत धाव घेणे सुरू आहे. औरंगाबादेत १० हजारांपेक्षा अधिक इंजेक्शनचा साठा आजघडीला उपलब्ध आहे.

औरंगाबाद महापालिकेकडे तब्बल ८ हजार इंजेक्शनचा साठा आहे. तर जिल्हा रुग्णालयाकडे २ हजार इंजेक्शन उपलब्ध आहेत. तर घाटीकडे आगामी काही दिवस रोज १०० ते २५० रुग्णांना इंजेक्शन देता येईल, एवढा साठा उपलब्ध आहे. औरंगाबादेत रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त मिलिंद काळेश्वरकर म्हणाले.

कोरोनावर रेमडेसिवीर हे इंजेक्शन प्रभावी मानले जात आहे. त्यामुळे या इंजेक्शनला मोठी मागणी आहे. राज्यातील पुणे, नांदेड, धुळे, जळगाव यासह अन्य शहरांत सहजासहज मिळत नसल्याची धक्कादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. औरंगाबादेत आजघडीला सर्वाधिक गंभीर रुग्ण घाटीत दाखल आहे. त्यामुळे याठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शनची सर्वाधिक गरज आहे. रुग्णालयात पुरेशा प्रमाणात इंजेक्शन उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. परंतु विविध शहरांतून घाटीला इंजेक्शनची मागणी केली जात आहे. दाखल रुग्णांना इंजेक्शन मिळणे आवश्यक असल्याने खासगी रुग्णालयाने इंजेक्शनचा साठा जाहीर करीत नसल्याचीही स्थिती आहे. इंजेक्शनसाठी नातेवाइकांना भटकंती करावी लागत आहे, अशी स्थिती अजून तरी औरंगाबादेत नाही. राजकीय नेत्यांचा दबाब अन्य जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा परिषद आणि जिल्हा रुग्णालयांतील कोरोना रुग्णांसाठी औरंगाबादेत इंजेक्शनची मागणी केली जात आहे. रुग्णालयात या पक्षाचे राजकीय पदाधिकारी दाखल आहे, त्यांना तत्काळ इंजेक्शन पाहिजे, असे सांगितले जात आहे. इंजेक्शन देण्यासंदर्भात राजकीय नेत्यांकडून औरंगाबादेतील रुग्णालयांवर दबावही टाकला जाते. परंतु शासकीय पत्र असेल तर इतर जिल्ह्यातील रुग्णांसाठी इंजेक्शन दिले जात असल्याचे सांगण्यात आले.

------

औरंगाबादची स्थिती

पहिल्या लाटेत रोज ११५ इंजेक्शनची गरज

आता रोज २५० ते ३०० इंजेक्शन गरज

सध्या दाखल रुग्ण -१४, ८९७

मुबलक साठा आहे

जिल्हा रुग्णालयाअतर्गंत २ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध आहे. तर महापालिकेकडे ८ हजार इंजेक्शनचा साठा आहे. त्याबरोबरच आणखी ४ हजार ५०० इंजेक्शनची ऑर्डर देण्यात आली आहे.

डाॅ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक