शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

‘खडकी गँग’च्या आवळल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:52 IST

बंगल्यांच्या लाकडी खिडक्यांचे पट काढून चोºया करणाºया ‘खिडकी गँग’च्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी रात्री यश आले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बंगल्यांच्या लाकडी खिडक्यांचे पट काढून चोºया करणाºया ‘खिडकी गँग’च्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी रात्री यश आले. वाळूज रोडवर आठ ते दहा किलोमीटर पाठलाग करून पोलिसांनी त्यांना पकडले. या चोरट्यांनी शहरात सात ते आठ बंगल्यांत घरफोड्या केल्याची कबुली दिली.सय्यद सिकंदर सय्यद अख्तर (३५, रा. महंमदिया कॉलनी, बीड), सय्यद सिराज सय्यद लियाकत (३२, रा. पूरग्रस्त कॉलनी, बीड, ह.मु. वडगाव गुप्ता, अहमदनगर) आणि शेख बबलू शेख रहेमान (३१, रा.नागापूर एमआयडीसी, दांगट मळा, अहमदनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे म्हणाले की, शहरातील सिडको एन-३, एन-४, व्यंकटेशननगर, सिडको एन-१ आदी वसाहतींमधील बंगल्यांच्या खिडक्या तोडून चोरट्यांनी लाखो रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याच्या घटना गेल्या काही दिवसांत घडल्या. या गुन्ह्यांच्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे पोलीस तपास करीत असताना घरफोड्या करणारी टोळी कारने वाळूज रोडने शहरात येत असल्याची माहिती खबºयाने पोलिसांना दिली. यानंतर पोलीस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक आयुक्त रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी गस्तीवर असलेले सहायक पोलीस निरीक्षक अजबसिंग जारवाल, पोहेकॉ शिवाजी झिने, विलास वाघ, राजेंद्र साळुंके, रवी दाभाडे, विशाल सोनवणे, देवचंद महेर, गजानन मांटे, सुनील धात्रक, प्रभाकर राऊत, चालक थोरे यांनी रात्री ९ वाजेच्या सुमारास वाळूज रोडवर सापळा रचला. यावेळी संशयित कार दिसताच पोलिसांनी चालकाला गाडी थांबविण्याचा इशारा केला; मात्र कारचालक न थांबता पुढे निघाला. यानंतर पोलिसांचा संशय बळावला आणि पोलिसांनी तब्बल आठ ते दहा किलोमीटर पाठलाग करून कारसमोर पोलिसांची जीप आडवी लावून त्यांना पकडले. पोलिसांनी फिल्मीस्टाईल त्यांच्यावर धावा बोलताच आरोपींना प्र्रतिकार करता आला नाही. यावेळी त्यांच्या कारची झडती घेतली असता त्यांच्याजवळ स्क्रू ड्रायव्हर, लहान टॉमी, रोख रक्कम, मोबाइल असा ऐवज मिळाला. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी गुन्हे शाखेत आणले. तेथे त्यांची कसून चौकशी केली असता ते अट्टल चोरटे असल्याचे समोर आले.६ घरे फोडल्याची कबुलीखिडकी गँगला पोलिसांनी विचारपूस करताच त्यांनी सिडको एन-३ येथील संजय नानाजी दराडे या व्यापाºयाच्या बंगल्यात ते आणि त्यांची आई झोपलेली असताना १६ नोव्हेंबर रोजी त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली.सहा महिन्यांपूर्वी झालेल्या या घटनेत चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख असा सुमारे १ लाख ४७ हजारांचा ऐवज लंपास केला. यासोबतच सिडको एन-३ येथे बंगल्यात भाड्याने राहणारे संपूर्ण कुटुंब घरात झोपलेले असताना रात्री अडीच वाजेच्या सुमारास खिडकीचे स्क्रू काढून आत प्रवेश केला आणि त्यांनी सुमारे तीन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम पळविली.यावेळी एका चोरट्याची स्लीपर चप्पल घटनास्थळी राहिली होती. या बंगल्याशेजारील अन्य एका बंगल्यात त्यांनी चोरीचा प्रयत्न केला; मात्र तेथे त्यांच्या हाती काहीच लागले नव्हते. व्यंकटेशनगर येथील कृषी अधिकारी अंकुशराव गुलाबराव कोलते यांच्या बंगलाची खिडकी काढून चोरट्यांनी रोख १ लाख रुपये आणि सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे पाच लाखांचा ऐवज चोरून नेल्याची कबुली दिली. याशिवाय निवृत्त पोलीस अधिकारी कटके यांच्या बंगल्यात आणि एन-१ येथील बंगल्यात चोरी केल्याची कबुली दिली.