औरंगाबाद : महापालिकेतील सत्ताधारी भाजप, काँग्रेस, अपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी एकत्र येऊन प्रशासनाच्या विरोधात मंगळवारी जोरदार बिगुल फुंकला. मागील १५ महिने २० दिवसांमध्ये मनपाने वॉर्डांमध्ये एक रुपयाचेही नवीन काम केलेले नाही. उलट पाणी, पथदिवे, कचरा आदी मूलभूत सोयीसुविधाही व्यवस्थितपणे देण्यात येत नाहीत. प्रशासनाचा धिक्कार करीत लवकर मनपासमोर उपोषणास बसण्याचा इशारा नगरसेवक, नगरसेविकांनी दिला आहे. नगरसेवकांनी अचानकपणे ही भूमिका घेतल्याने सत्ताधारी शिवसेनेची बरीच गोची झाली. महापालिकेत सध्या विकासकामे ठप्प झाली आहेत. (पान ५ वर) जायकवाडी धरण भरलेले असतानाही अनेक वॉर्डांमध्ये आठ-दहा दिवस पाणी येत नाही. प्रशासन-कंपनी तक्रारही ऐकून घेत नाही. ४विष्णुनगर, अरिहंतनगरसह अनेक वॉर्डांमध्ये दूषित पाण्यामुळे नागरिक आजारी पडत आहेत. दूषित पाण्याचा गंभीर प्रश्नही मनपा सोडविण्यास तयार नाही. ४पथदिवे बंद आहेत. तक्रार केली तर अधिकारी फोन घेत नाहीत. कंत्राटदार म्हणतात आमच्या नऊ महिन्यांचे बिल थकले. मग दिवे लावणार तरी कोण? ४ दररोज कचराही उचलण्यात येत नाही.