शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओच्या कॉमन सर्व्हिस सेंटरचा वाहनधारकांना भुर्दंड

By admin | Updated: February 10, 2017 21:32 IST

आरटीओ कार्यालयाने जिल्ह्यात कॉमन सर्व्हिस सेंटर(सीएससी)च्या माध्यमातून विविध कामकाजाची सुविधा केली आहे. मात्र...

संतोष हिरेमठ/ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 10 - आरटीओ कार्यालयाने जिल्ह्यात कॉमन सर्व्हिस सेंटर(सीएससी)च्या माध्यमातून विविध कामकाजाची सुविधा केली आहे. मात्र ही कामे करताना वाहनधारकांना शासनाच्या शुल्काव्यतिरिक्त २० रुपये अदा करावे लागत आहेत. याचा वाहनधारकांना चांगलाच भुर्दंड बसत आहे. यातून या सेंटर्सच्या तिजोरीत महिन्याकाठी लाखो रुपयांची भर पडणार आहे. शिवाय सीएससी सेंटरमुळे आरटीओतील शुल्क स्वीकारणारे कक्षच बंद केले जात आहे. त्यामुळे हे सीएससी सेंटर म्हणजे आरटीओ कार्यालयासाठी ह्यकॅशियर से छुटकाराह्णच ठरत आहेत.जिल्ह्यातील ६०० सीएससी सेंटर्सवर आरटीओच्या कामकाजाची सुविधा देण्यात आली आहे. आॅनलाईन अर्ज, कागदपत्रे अपलोड, शुल्क भरणे आदी कामे या ठिकाणी करता येत आहेत. त्याचा वाहनधारकांना मोठा आधार मिळेल अशी अपेक्षा व्यक्त आहे. परंतु त्यासाठी शासकीय शुल्काशिवाय वाहनधारकांना २० रुपये सेवा शुल्क द्यावे लागत आहे. त्यामुळे आरटीओ कारर्यालयाच्या कामकाजाचे एकप्रकारे खाजगीकरण करण्यात येत आहे का, असा प्रश्न वाहनधारकांमधून उपस्थित होत आहे. सीएससी सेंटरबरोबरच आरटीओ कार्यालयातर्फे इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, के्रडिट कार्डद्वारे आॅनलाईन शुल्क भरण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र या सुविधेमुळे आता कार्यालयात शुल्क स्वीकारणारे रोखपाल कमी करण्यात येत आहे. ६ फेब्रुवारीपासून शिकाऊ वाहन परवान्याचे (लर्निंग लायसन्स) शुल्क स्वीकारणे बंद करण्यात आले. त्यामुळे शुल्क भरण्यासाठी शहरातील सीएससी सेंटरची शोधाशोध करण्याची वेळ उमेदवारांवर येत आहे. आता १ मार्चपासून तालुक्याच्या ठिकाणी होणाऱ्या शिबीर कार्यालयामध्ये रोखपालामार्फत शुल्क स्वीकारणे बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी), नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्डद्वारे आॅनलाईन पद्धतीने शुल्क भरणा केलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत. लवकरच पर्मनंट लायसन्ससह इतर कामकाजाचेही शुल्क स्वीकारणे बंद होईल. त्यामुळे २० रुपयांच्या सेवा शुल्कातून सीएससी सेंटर्स चालक मात्र मालामाल होणार आहे.दररोज लर्निंगसाठी २४० अपॉॅइंटमेंटआरटीओ कार्यालयात दररोज २४० उमेदवारांना लर्निंग लायसन्ससाठी अपॉॅइंमेंट दिली जाते. यानुसार सीएससी सेंटरवरून अर्ज भरणे, शुल्क भरणे यासाठी प्रत्येक उमेदवारास २० रुपये याप्रमाणे २४० उमेदवारांकडून ४ हजार ८०० रुपये आकारले वसूल होतात. महिन्याकाठी हा आकडा १ लाख ४४ हजार रुपयांवर जातो.दररोज पर्मनंटसाठी १८०अपॉॅइंटमेंटआरटीओत दररोज १८० वाहनचालकांना पर्मनंट लायसन्ससाठी अपॉॅइंमेंट मिळते. यानुसार सीएससी सेंटरवरून अर्ज भरणे, शुल्क भरण्याच्या कामातून प्रतिउमेदवार २० प्रमाणे दररोज ३ हजार ६०० रुपये होतात. महिन्याला हा आकडा १ लाक ८ हजार रुपयांवर जातो.बदल स्वीकारून एजंटांचा कारभारआरटीओ कार्यालयातील एजंटगिरीला चाप बसण्यासाठी आॅनलाईन प्रणालीसह सीएससी सेंटरच्या माध्यमातून कामकाजावर भर दिला जात आहे. परंतु एजंटांनी बदल स्वीकारून कारभार सुरूच ठेवला आहे. लॅपटॉप, इंटरनेट, डेबीट, के्रडीट कार्ड, मोबाईल बॅकिंगच्या माध्यमातून उमेदवारांची कामे करीत आहे. त्यामुळे एजंटगिरीच वाढत आहे. केंद्रातूनच निर्णयशुल्क वाढ असो की अन्य काही आरटीओ कार्यालयासंदर्भातील निर्णय हे केंद्रातून होतात. सीएससी सेंटरसंदर्भात परिवहन आयुक्त कार्यालयाने निर्णय घेतला. शिवाय आचाररसंहिता असल्याने याविषयी काही सांगता येणार नाही.-दिवाकर रावते, परिवहन मंत्री