शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे पाकिस्तान करतोय बॉम्बिंग, इकडे भारतानं अफगाणिस्तानला पाठवली मोठी मदद; तालिबान सरकार खुश
2
एकतर्फी प्रेमातून मुलाचं 'LIVE Suicide', आधी पेट्रोल ओतून पेटून घेतलं, मग रुग्णालयाच्या छतावरून मारली उडी
3
मनमोहनसिंग सरकारमधील कोळसामंत्री श्रीप्रकाश जायसवाल यांचे निधन, कानपूरमधून तीन वेळा झाले होते खासदार
4
SMAT 2025 : आयुष म्हात्रेचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
5
डीके शिवकुमार यांच्या आमदारांशी गाठीभेटी; उद्या सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत ब्रेकफास्ट करणार...
6
IND vs SA ODI Series : टेस्टमध्ये नापास! इथं पाहा गंभीर 'गुरुजीं'चं वनडेतील 'प्रगतीपुस्तक'
7
११ जहाल नलक्षवाद्यांचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण; हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला हादरा
8
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
9
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
10
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
11
५ राजयोगात १४१ दिवसांनी शनि मार्गी: ९ राशींचे कल्याण, सुख-समृद्धीचे वरदान; सौभाग्य-यश-लाभ!
12
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
13
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
14
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
15
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
16
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
17
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
18
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
19
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुद्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
20
नेपाळने भारताला डिवचले; 100 रुपयांच्या नवीन नोटेवर भारताचा भूभाग आपला दाखवला
Daily Top 2Weekly Top 5

सराईत ‘झोल्या’च्या आवळल्या मुसक्या

By admin | Updated: July 3, 2017 23:44 IST

बीड :घरफोड्यांचा मास्टर मार्इंड असलेला सराईत गुन्हेगार झोल्याच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आष्टी शहरासह तालुक्यात घरफोड्या होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, तसेच पोलिसांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत होती. अखेर या घरफोड्यांचा मास्टर मार्इंड असलेला सराईत गुन्हेगार झोल्याच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आहे. ६ घरफोड्या उघडकीस आल्या असून, पावणेतीन लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.२०१७ या वर्षात आष्टीसह परिसरात अनेक ठिकाणी घरफोड्या झाल्या. लाखोंचा ऐवज लंपास करण्याबरोबरच घरातील लोकांना मारहाण झाल्याच्या घटनाही घडल्या. यामुळे आष्टी तालुक्यात चोरट्यांची दहशत निर्माण झाली होती. पोलीस तपास करीत नसल्याचे ताशेरे ओढले जात होते. पोलिसांसमोरही या घरफोड्यांचा शोध लावण्याचे मोठे आव्हान होते. स्थानिक गुन्हे शाखेचे दिनेश आहेर यांच्यासह पूर्ण टीम आष्टी तालुक्यात तळ ठोकून होती. या भागातील सराईत, तसेच छोट्यामोठ्या गुन्हेगारांची यादी गुन्हे शाखेने मागविली होती; परंतु हाती काहीच लागले नाही. त्यामुळे तपास लावण्याचे मोठे आव्हान आहेर यांच्या टीमसमोर होते. अखेर २९ जून रोजी त्यांना शेकापूर रोडवरील पांडेगव्हाणमध्ये घरफोड्यातील मास्टर मार्इंड आयलाश्या ऊर्फ झोल्या जंगल्या भोसले (रा. पांडेगाव) बद्दल माहिती मिळाली. गुन्हे शाखेने शिताफीने सापळा रचून धुळ्याला बेड्या ठोकल्या. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. दिनेश आहेर, सपोनि सचिन पुंडगे, तुळशीराम जगताप, भास्कर केंद्रे, प्रसाद कदम, सतीश कातखडे, सखाराम सारूक, अशोक दुबाले, संजय खताळ आदींनी केली.