शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

४० आरोग्य केंद्रांना मिळणार छताचा आधार

By admin | Updated: March 27, 2015 00:26 IST

जालना : जिल्ह्यात एकूण ४० प्राथमिक आरोग्य केंद्रे असून या जवळपास सर्वच ठिकाणी पावसाळ्यात छतांना गळती लागते.

जालना : जिल्ह्यात एकूण ४० प्राथमिक आरोग्य केंद्रे असून या जवळपास सर्वच ठिकाणी पावसाळ्यात छतांना गळती लागते. त्यामुळे या इमारतींवर टीन छताची उभारणी करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या वतीने आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्य सभापती ए.जे. बोराडे यांनी दिली.पावसाळ्यात शस्त्रक्रियागृह व प्रसुतिगृहांच्या गळतीमुळे जून ते आॅगस्ट या कालावधीत कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे काम पूर्णपणे ठप्प झालेले असते. प्रसुतिगृह गळत असल्यामुळे त्या ठिकाणी प्रसूती करण्यासाठी अडचणी उद्भवतात. त्यामुळे आपण स्वत: याबाबतचा प्रस्ताव राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे दाखल केल्याचे सभापती बोराडे यांनी सांगितले.या प्रस्तावामध्ये इमारतीवर तीन फूट उंचीवर टीनशेडची उभारणी केल्यास पावसाळ्यातील इमारतींची गळती थांबून रूग्णसेवेतील अडचणी दूर होतील. एका प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी साधारणत: ४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.याप्रमाणे ४० प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी १ कोटी ६० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. ही नाविन्यपूर्ण व रूग्णहिताची योजना राबविण्यासाठी अनुदान उपलब्ध करून द्यावे, असेही सभापतींनी नमूद केले आहे. (प्रतिनिधी)