शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

सूक्ष्मजीवशास्त्राची भूमिका महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 01:39 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे आयोजित ‘महामायक्रोकॉन २०१७’ या भारतीय वैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांच्या परिषदेचे शनिवारी वर्षा ठाकू र यांच्या हस्ते उद्घाटन झाले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सूक्ष्मजीवशास्त्रातील तज्ज्ञांची जबाबदारी ही डॉक्टरांपेक्षा वेगळी आहे. उपचारात, तसेच रुग्ण ठणठणीत झाल्यानंतर केवळ डॉक्टरच समोर येतात; परंतु आजारांच्या पाठीमागील विषाणू शोधून, आजाराचे निदान करणारे सूक्ष्मजीवशास्त्रातील तज्ज्ञ हे कधीही समोर येत नाहीत, मात्र ते रुग्णांच्या उपचारात महत्त्वाची भूमिका निभावतात. या क्षेत्रातील तज्ज्ञांनी नवनवीन संशोधन करून पुढे जाण्याची गरज आहे, असे विभागीय उपायुक्त वर्षा ठाकूर म्हणाल्या.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे आयोजित ‘महामायक्रोकॉन २०१७’ या भारतीय वैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांच्या परिषदेचे शनिवारी (दि. १४) वर्षा ठाकू र यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, ‘पीएचएफआय’चे संचालक डॉ. सुभाष साळुंके, इंडियन असोसिएशन आॅफ मेडिकल मायक्रोबायोलॉजीचे अध्यक्ष डॉ. किशोर इंगोले, संयोजन अध्यक्ष डॉ. अजित दामले, संयोजन सचिव डॉ. ज्योती इरावणे (बजाज), डॉ. वीरेंद्र काशेट्टी, डॉ. छाया कुमार यांची उपस्थिती होती.वर्षा ठाकूर म्हणाल्या, स्वाइन फ्लूसारख्या आजारांचा वेळोवेळी उद्रेक दिसतो. अनेक विषाणू औषधांना दाद देत नाहीत. औषधांचा कोणताही परिणाम दिसत नाही. त्यामुळे या बाबींवर संशोधनाची आवश्यकता आहे, असे त्याम्हणाल्या. डॉ. येळीकर म्हणाल्या, एड्स, क्षयरोगासारख्या आजारांत या शाखेने महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यामुळे हे आजार नियंत्रणात आले. अनेक विषाणू हे डोळ्यांनी दिसत नाहीत; परंतु ते आरोग्यासाठी धोकायदायक ठरतात.या क्षेत्रातील तज्ज्ञांनी आजारांचे मूळ शोधून त्यावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे डॉ. कानन येळीकर म्हणाल्या. परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ़ जयश्री भाकरे, डॉ़ अनिल गायकवाड, डॉ़ मंगला हरबडे, डॉ़ मुक्ता खापरखुंटीकर, डॉ़ लईक जाफरी, डॉ़ अर्जुन जाधव, डॉ़ अनुजा सामाले परिश्रम घेत आहेत़