शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक वादातून रॉड, काठीने जबर मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 23:44 IST

शहरातील बंजारा कॉलनीमध्ये कौटुंबिक वादातून दहा ते पंधरा जणांच्या टोळीने घरातील सदस्यांवर रॉड, काठीने फिल्मीस्टाईल मारहाण केल्याची घटना ३० आॅगस्ट रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला असून इतर चौघांनाही जबर मार लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर : शहरातील बंजारा कॉलनीमध्ये कौटुंबिक वादातून दहा ते पंधरा जणांच्या टोळीने घरातील सदस्यांवर रॉड, काठीने फिल्मीस्टाईल मारहाण केल्याची घटना ३० आॅगस्ट रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला असून इतर चौघांनाही जबर मार लागला आहे.शहरातील बंजारा कॉलनीमध्ये मागील अनेक महिन्यांपासून सय्यद अफसर अली महम्मद अली हे कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. ३० आॅगस्ट रोजी सकाळी त्यांची लहान मुलगी सुमय्या बेगम हिस घेण्यासाठी सासरकडील मंडळी घरी आले होते. मात्र दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास मोठे जावई शेख नदीम याने अनोळखी १० ते १५ जणांना घेऊन आलेल्या पाहुण्यांवर व घरातील इतर सदस्यांवर लोखंडी रॉड तसेच लाकडी काठ्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली.या मारहाणीत सय्यद निशाद, सुमय्या बेगम, जकीया सुलताना, जरीना चाऊस, सय्यद ख्वाजाबी हे पाच जण जखमी झाले. यात सय्यद निशाद यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना परभणी येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.दरम्यान, १० ते १५ जणांनी कुटुंबाच्या सदस्यांवर लोखंडी रॉड व काठ्यांनी अचानक हल्ला चढविल्यानंतर नागरिकांनी संबंधित घराकडे धाव घेऊन मध्यस्थी केली. त्यामुळे हल्लेकरू घटनास्थळावरून पसार झाले. बुधवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता.