विकास काशीनाथ जाधव (२६, रा. सातारा परिसर) हा ३ नोव्हेंबरला वाळूज एमआयडीसीतील इंडुरन्स कंपनीत मुलाखत देण्यासाठी आला होता. कंपनीत मुलाखत देऊन दुचाकीने (एम.एच.- २०, सीडी- ६०६५) विकास घरी चालला होता. दरम्यान, रात्री ८.३० वाजेच्या सुमारास विकास यास त्याचा मित्र सिद्धांत साकला याचा फोन आल्यामुळे विकास याने औद्योगिक क्षेत्रातील एनआरबी चौकात दुचाकी उभी करून मित्रासोबत बोलत होता. यावेळी पाठीमागून आलेल्या दोन भामट्यांनी दुचाकीवर बसलेल्या विकासच्या हातातील मोबाइल हिस्कावून घेतला. यानंतर दोघा भामट्यांनी विकास यास मारहाण करून पुलाखाली ढकलून देत त्याची दुचाकी घेऊन विटावाकडे पसार झाले. विकासने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे गाठून पोलिसांना आपबीती सांगितली. या घटनेमुळे धक्का बसलेल्या विकास याने पोलीस ठाण्यात तक्रार न देता घरी निघून गेला.
तीन आठवड्यांनंतर दिली तक्रार
शनिवारी गावावरून परतल्यानंतर विकासने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. लुटमार करणाऱ्या त्या दोघा भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक सतीश पंडित करीत आहेत.
---------------------