शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
3
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
4
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
5
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
6
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
7
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
8
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
9
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
10
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
11
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
12
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
13
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
15
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
16
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
17
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
18
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
19
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
20
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?

रस्ता तसा चांगला; अतिक्रमणाने व्यापला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:11 IST

गजानन महाराज मंदिर ते पुंडलिकनगर ते जयभवानीनगर या १ कि़मी. रस्त्यावर १० वर्षांत ९ कोटी रुपयांचा खर्च करून तो चांगला करण्यात आला. सध्या चांगल्या स्थितीत असलेला तो रोड अतिक्रमणाने व्यापला आहे. २४ मीटर विकास आराखड्यानुसार असलेल्या त्या रोडचीकाँक्रिटीकरण रुंदी १२ मीटर इतकी आहे. दोन्ही बाजूंनी ३ फुटांचे पेव्हिंग ब्लॉक बसवून फुटपाथ करण्यात आले आहेत; परंतु ते फुटपाथ हातगाड्या, बेशिस्त रिक्षा, गॅरेज, वॉशिंग सेंटर्सने बळकावल्यामुळे रहदारीसाठी फक्त १२ ते १४ फुटांचा रोड शिल्लक राहतो आहे. परिणामी, रुग्णवाहिका, स्कूलबस, एस.टी. बसला जाण्यासाठी पूर्ण रस्ता मिळत नाही. गजानन महाराज मंदिरापासूनच ही अवस्था सुरू होते.

ठळक मुद्दे९ कोटीचा खर्च : २४ मीटरचा रस्ता; काँक्रिटीकरण १२ मीटरवरच; वाहतुकीसाठी निम्माच रस्ता

विकास राऊत/बापू सोळुंके ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गजानन महाराज मंदिर ते पुंडलिकनगर ते जयभवानीनगर या १ कि़मी. रस्त्यावर १० वर्षांत ९ कोटी रुपयांचा खर्च करून तो चांगला करण्यात आला. सध्या चांगल्या स्थितीत असलेला तो रोड अतिक्रमणाने व्यापला आहे. २४ मीटर विकास आराखड्यानुसार असलेल्या त्या रोडचीकाँक्रिटीकरण रुंदी १२ मीटर इतकी आहे. दोन्ही बाजूंनी ३ फुटांचे पेव्हिंग ब्लॉक बसवून फुटपाथ करण्यात आले आहेत; परंतु ते फुटपाथ हातगाड्या, बेशिस्त रिक्षा, गॅरेज, वॉशिंग सेंटर्सने बळकावल्यामुळे रहदारीसाठी फक्त १२ ते १४ फुटांचा रोड शिल्लक राहतो आहे. परिणामी, रुग्णवाहिका, स्कूलबस, एस.टी. बसला जाण्यासाठी पूर्ण रस्ता मिळत नाही. गजानन महाराज मंदिरापासूनच ही अवस्था सुरू होते.गजानन महाराज मंदिर चौक, शिवाजी महाराज चौक पुंडलिकनगर आणि जयभवानीनगर शिवाजी महाराज चौकात पादचाºयांना चालता येत नाही, अशी अवस्था असते तर दुचाकींमुळे किरकोळ अपघातांची मालिका रोज सुरू असते. लोकमतच्या टीमने गुरुवारी सदरील रोड तीन ठिकाणी मोजला. काँक्रिटीकरणाच्या दोन्ही बाजंूच्या २० फुटांपैकी कुठे १२ फूट, तर कुठे १५ फूट रोड अतिक्रमणामुळे शिल्लक राहतो. त्यामुळे रोड रुंद असला तरी तो अतिक्रमणांमुळे व्यापला आहे.जालना रोडला पर्याय म्हणून या रस्त्याचा वापर अलीकडे वाढला आहे. १९९२ च्या विकास आराखड्यातील रस्ता २००७ मध्ये डांबरीकरणातून करण्यात आला. त्यावर्षी अडीच कोटी रुपयांचा खर्च त्यावर झाला, तर २०१६ मध्ये त्या रोडचे काँक्रिटीकरण करण्यासाठी साडेसहा कोटी रुपये खर्च करण्यात आले. तसेच मार्च २०१५ मध्ये गजानन मंदिर ते पुंडलिक राऊत चौकापर्यंत ३० लाख रुपये खर्चातून दुभाजक बसविण्याचे काम करण्यात आले. तेथून पुढे जयभवानीनगरपर्यंत दुभाजक नसल्यामुळे बेशिस्त वाहतूक सुरू झालेली आहे. हनुमान चौक अपघातांचा चौक झाला असून, मागील तीन महिन्यांत रात्री भरधाव वेगाने जाणाºया वाहनांचे सहा अपघात झाले आहेत. जीएनआय इन्फ्रा. या कंत्राटदाराने त्या रोडचे काम केले आहे.पोलिसांचीजबाबदारी काय?दुचाकी नो पार्किंगमध्ये असल्यास पोलीस उचलतात; परंतु चारचाकी दिवसभर गॅरेजसमोर, मंगल कार्यालयासमोर उभ्या असतात. त्या वाहनांमुळे वाहतूक खोळंबते. त्यांच्यावर कुठलीही कारवाई पोलीस करीत नाहीत. जालना रोडप्रमाणे त्या रोडवर पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने गस्त घालावी. गॅरेजमुळे अरुंद होत चाललेला रस्ता मोकळा ठेवावा, अशी मागणी होत आहे.रोडचे अलायमेंट हुक लेभूमिगत गटार योजनेच्या कामामुळे ५०० मीटरपर्यंतच्या रोडचे अलायमेंट हुकले आहे. परिणामी, पुंडलिक राऊत चौक ते गजानन मंदिरपर्यंतच्या एका बाजूच्या दुकानांमध्ये पावसाळ्यात पाणी शिरते. गेल्या पावसाळ्यात बहुतांश दुकानांमध्ये शिरलेले पाणी अग्निशमन पथकाने काढले होते. एका बाजूने रोड दीड फूट वर झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवते.नगरसेवकांचे मत असेरोड मोजण्यासाठी नगरसेवक राजू वैद्य यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या विद्यानगर या वॉर्डात ५०० मीटर अंतराचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. तो पूर्ण टप्पा अतिक्रमित असल्यामुळे त्यांनी वारंवार पालिका व पोलीस प्रशासनाला वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्याबाबत सूचना केल्या. वैद्य लोकमतच्या टीमशी बोलताना म्हणाले, रहदारी अडथळा होणारे अतिक्रमण तातडीने काढले पाहिजे. रोडचा फुटपाथ जर कुणी चारचाकी वाहने लावत असेल, तर पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित आहे.