शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांचा जालन्यात रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:16 IST

दैठणातील शेतक-यांच्या मृत्यूप्रकरणी संतप्त शेतकºयांनी आज रास्ता रोको शहरातील अंबड चौफुलीवर रास्ता रोको केला. महावितरण आणि अधिका-यांवर गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी शेतक-यांनी केलेल्या रास्तारोकोमुळे मार्गावरील वाहतूकी दीड तासांहून अधिक काळ ठप्प झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दैठणातील शेतक-यांच्या मृत्यूप्रकरणी संतप्त शेतकºयांनी आज रास्ता रोको शहरातील अंबड चौफुलीवर रास्ता रोको केला. महावितरण आणि अधिका-यांवर गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी शेतक-यांनी केलेल्या रास्तारोकोमुळे मार्गावरील वाहतूकी दीड तासांहून अधिक काळ ठप्प झाली होती. गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.घनसावंगी तालुक्यातील दैठणा शिवारात डिझेल पंप सुरु करताना तीन शेतकºयांचा गुदमरुन मृत्यू झाला होता. तर तीनजण गंभीर जखमी झाले. या घटनेचे आज तीव्र पडसाद उमटले. बुधवारी दैठण्यातील संतप्त शेतकºयांनी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास अंबड चौफुलीवर रास्तारोको आंदोलन सुरु केले. महावितरण व अधिकाºयांविरुध्द गुन्हे दाखल करुन संबंधिताना अटक करेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलनकांनी घेतला.शेतकºयांच्या इशाºयाने पोलीस प्रशासनही भांबावून गेले. दरम्यान, जि. प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, माजी आ. कैलास गोरंट्याल, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, संतोष मोहिते, अनिल घनवट यांच्यासह शेतकरी संघटनेचे आप्पासाहेब कदम, जगन्नाथ काकडे, अरविंद देशमुख, संतोष कºहाळे, अ‍ॅड. शैलेश देशमुख, अशोक भुतेकर, अशोक पडूळ आदी मंडळी चौफुलीवर दाखल झाली. आंदोलनकर्त्यांशी चर्चा करुन नेत्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे आणि पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांना निवेदन सादर केले. महावितरणच्या गलथान कारभारामुळे तीन शेतकºयांचा मृत्यू झाला असून, वीज पुरवठा सुरळीत असता तर ही घटना घडलीच नसती. त्यामुळे संबंधितांविरुध्द तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. शिष्टमंडळात जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, माजी आ. कैलास गोरंट्याल, भास्कर अंबेकर यांचा समावेश होता.जिल्हाधिकाºयांशी चर्चा करुन शिष्टमंडळाने शेतकरºयांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. परंतू महावितरणच्या अधिकाºयांना अटक करण्याच्या भूमिकेवर आंदोलक ठाम होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांनी प्रकरणाच्या चौकशीनंतर कडक कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली.त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दैठणा येथील घटनेत मृत्यू पावलेल्या शेतकºयांच्या वारसांना शासकीय नोकरीत समाविष्ट करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.सदरील घटनेत बाबासाहेब बापूराव वाबळे (५५), रामेश्वर बाबासाहेब वाबळे (२८) व अर्जुन साहेबराव धांडे या तिघांचा मृत्यू झाला. तर परमेश्वर बाबासाहेब वाबळे, अशोक बापूराव वाबळे हे बेशुद्ध झाले होते.