शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय आरोपांत रस्त्यांचा धुराळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:03 IST

औरंगाबाद : राज्यातील सगळ्याच ठप्प पडलेल्या, संथगतीने सुरू असलेल्या रस्त्यांची कामे केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या लेटरबॉम्बनंतर संशयाच्या भोवऱ्यात ...

औरंगाबाद : राज्यातील सगळ्याच ठप्प पडलेल्या, संथगतीने सुरू असलेल्या रस्त्यांची कामे केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या लेटरबॉम्बनंतर संशयाच्या भोवऱ्यात आली आहेत. कामे कुणामुळे थांबली यावरून चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिवसैनिकांमुळे रस्त्यांच्या कामांना ब्रेक लागला. त्यांना आवर घाला, अशा सूचना पत्रातून केल्यानंतर जिल्ह्यात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांना राजकीय लुडबुडीमुळे ब्रेक लागल्याचे वारंवार होत असलेले आरोप खरे आहेत की काय, अशी चर्चा सुरू आहे. या सगळ्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमध्ये रस्त्यांचा धुराळा उडतो आहे. खड्डेयुक्त आणि अर्धवट रस्त्यांवरून जाताना वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे.

औरंगाबाद ते जळगाव

मागील चार वर्षांपासून औरंगाबाद ते जळगाव रस्त्याचे काम सुरू आहे. कंत्राटदार बदलूनही या कामाला गती मिळत नाही. १ हजार कोटींतून रस्ता एनएचएआयच्या राज्य कार्यालयाच्या देखरेखीतून करण्यात येत आहे. फुलंब्रीपर्यंत देखील या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही.

औरंगाबाद ते धुळे

२०११ पासून साेलापूर - औरंगाबादमार्गे धुळे या राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ चे काम सुरू आहे. औरंगाबाद ते कन्नडपर्यंत रस्त्याचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. १२०० कोटींहून अधिक कोटींची निविदा या कामासाठी आहे. मध्यंतरी टक्केवारी मागण्याच्या आरोपावरून या रस्त्याचे प्रकरण गाजले होते.

औरंगाबाद ते शिर्डी

औरंगाबाद ते शिर्डी हा तीसगाव मार्गे जाणारा रस्ता एनएच २११ मुळे दुरुस्तीसाठी हाती घेतलाच नाही. बांधकाम विभागाने मध्यंतरी या रस्त्याचे काम केले. दहेगावजवळ दोन कि.मी. रस्त्याचे काम मागील अनेक वर्षांपासून राजकीय खोडा आणल्यामुळे पूर्ण होत नाही.

औरंगाबाद ते पैठण

लिंक रोड ते पैठण या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम ८ वर्षांपासून रेंगाळलेले आहे. सुरुवातीला ३५० कोटींतून हा रस्ता करण्यात येणार होता. त्यानंतर एनएचएआयने ९०० कोटींतून काम करण्याच्या अनुषंगाने रस्त्याच्या डीपीआरचे काम हाती घेतले; परंतु अद्याप या रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागलेला नाही.

भाजपाचे आरोप

शिवसेनेच्या मतदारसंघात ज्याठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. तेथेच कामांच्या अडचणी आहेत. शिवसैनिकांकडून कंत्राटदारांना चांगली वागणूक मिळत नाही. त्यामुळेच कामांना गती मिळत नाही. ते कशासाठी करतात, हे सगळ्यांनाच माहिती आहे.

संजय केणेकर, शहर जिल्हाध्यक्ष भाजपा

शिवसेनेचे पलटवार असा

जळगाव रस्त्याचे ३ ते ४ वर्षांपासून काम सुरू आहे. शिवसेनेने तेथे कंत्राटदारांना मदत केली; परंतु भाजपाच्या नेत्यांच्या जाचामुळे कंत्राटदार पळून गेला. हप्तेखोरीचा प्रकार शिवसैनिकांनी केलेला नाही. पैठण रोडचा तर काय घोळ चालू हे केंद्र शासनालाच माहिती आहे.

नरेंद्र त्रिवेदी, जिल्हाप्रमुख शिवसेना

काँग्रेसची भूमिका

केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांऐवजी जीएसटीची थकीत रक्कम देण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहावे. जेणेकरून राज्यातील ठप्प पडलेली कामे काही प्रमाणात का होईना सुरळीत होतील. राजकीय आरोप करण्यात काहीही तथ्य नाही. रस्त्याची कामे पैशांअभावी थांबलेली आहेत.

सुमेंध निमगावकर, काँग्रेस प्रदेश सचिव

डमी क्रमांक

१०७९