केळगाव : दाभाडे वस्ती ते आधरवाडी, तांडामार्गे कोऱ्हाळा रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, हा रस्ता वाहनधारकांसाठी जीवघेणा ठरला आहे. निवडणुका आल्या की, लोकप्रतिनिधींकडून या रस्त्याच्या दुरुस्तीची आश्वासने दिली जातात. मात्र, नंतर परिस्थिती ‘जैसे थे’च असते.
शासन शहरी भागासह ग्रामीण भागातील रस्ते पक्के व्हावे, यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देते. मात्र, असे असतानाही दाभाडे वस्ती ते कोऱ्हाळा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. वाहनधारकांना वाहन घेऊन जाताना जागोजागी खड्ड्यांचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात तर या रस्त्याची अवस्था न विचारलेली बरी इतकी दयनीय होते. या रस्त्यावर अपघातांचे सत्रही सुरूच आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन रस्त्याचे मजबुतीकरण करावे, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.
सहा किलोमीटर अंतर कापण्यासाठी अर्धा तास
दाभाडे वस्ती ते कोऱ्हाळा या अंतरासाठी वाहनधारकांना तब्बल अर्धा तास लागत आहे. जागोजागी खड्डे, रस्त्यावरील खडी, दगडांना चुकवत वाहनधारकांना मार्ग काढावा लागतो. त्यामुळे अपघात होत आहेत. रस्त्यात अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकताना चर खोदल्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे.
060521\img_20210313_160334_654_1.jpg
दाभाडे वस्ती ते कोऱ्हाळा रस्ता बनला जीवघेणा