वाळूज महानगर : दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने बजाजनगरातील रस्ते उखडले असून, काही महिन्यांपूर्वीच पॅचवर्कसाठी खर्च करण्यात आलेले लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. जागोजागी खड्डे पडल्यामुळे वाहनधारक व पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. बजाजनगरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यात दोन दिवसांपूर्वीच्या पावसाने अधिकच भर पडली आहे. मोरे चौक ते मोहटादेवी मंदिर, प्रताप चौक -रामलीला मैदान या मुख्य रस्त्यांवर कायम कामगार व नागरिकांची वर्दळ असते; परंतु रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांची वाहन चालविताना आदळआपट होत आहे. पादचाऱ्यांना तर पायी चालणे कठीण होऊन बसले आहे. पाणी साचल्याने वाहन खड्ड्यात जाऊन वाहनधारक खाली पडत आहेत. वाहनामुळे खड्ड्यातील गढूळ पाणी व चिखल पादचाऱ्यांच्या अंगावर उडत असल्याने वाहनधारक व पादचारी यांच्यात वाद होत आहेत. खड्ड्यातील पाणी अंगावर उडून जागृत हनुमान व मोहटादेवी मंदिरात दर्शनासाठी आलेल्यांचे कपडे खराब होत आहेत. रस्ते दुरुस्तीसंदर्भात अनेक वेळा नागरिकांनी मागणी करूनही प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.नागरिकांमध्ये संताप विशेष म्हणजे एमआयडीसी प्रशासनाने लाखो रुपये खर्चून काही महिन्यापूर्वीच बजाजनगरातील रस्त्याच्या पॅचवर्कचे काम केले आहे. मात्र, पहिल्याच पावसात प्रशासनाने केलेल्या कामाचे पितळ उघडे पडले आहे.काही दिवसांतच बुजविण्यात आलेले खड्डे संपूर्ण उखडल््याने पॅचवर्कचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. त्यामुळे पॅचवर्क कामाच्या दर्जाविषयी नागरिकांमधून शंका सुविधा पुरविण्यात एमआयडीसी प्रशासन अपयशी ठरत असल्याने बजाजनगरवासीयांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
बजाजनगरातील रस्त्याची लागली वाट
By admin | Updated: July 26, 2014 01:10 IST