औरंगाबाद : औरंगाबाद पूर्वचे काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांच्या प्रचारार्थ मराठी- हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख याचा ‘रोड शो’ शनिवारी आयोजित करण्यात आला आहे.११ आॅक्टोबर रोजी दुपारी होणाऱ्या या ‘रोड शो’मध्ये औरंगाबाद पूर्वमधील अनेक भागांत रितेश देशमुख हा राजेंद्र दर्डा यांचा प्रचार करणार आहे. ‘लय भारी’ हा त्याचा मराठी चित्रपट अलीकडेच सुपरहिट ठरला. ‘डरना जरुरी है’, ‘मस्ती’, ‘ग्रँड मस्ती’, ‘हे बेबी’, ‘दे ताली’, ‘चमकू’, ‘हाऊसफुल्ल’ अशा अनेक चित्रपटांत विभिन्न प्रकारच्या भूमिका साकारून तसेच ‘बालक पालक’ व ‘येलो’ या दोन मराठी चित्रपटांची निर्मिती करून रितेशने सिनेसृष्टीत आपला ठसा उमटविला आहे. या गुणी कलाकाराशी समोरासमोर संवाद साधण्याची संधी नागरिक व विशेषत: युवा वर्गाला मिळणार आहे. शहराच्या विविध भागांत नागरिकांना आवाहन करून रितेश मतदानाचे महत्त्व सांगणार आहे.
रितेश देशमुखचा उद्या ‘रोड शो’
By admin | Updated: October 10, 2014 00:43 IST