शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज महानगरात रिमझिम पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:29 IST

वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात सोमवारी (दि.१४) दुपारी २ वाजेच्या सुमारास हलका रिमझिम पाऊस पडला. गत दोन दिवसांपासून ...

वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात सोमवारी (दि.१४) दुपारी २ वाजेच्या सुमारास हलका रिमझिम पाऊस पडला. गत दोन दिवसांपासून औद्योगिक परिसरात ढगाळ वातावरण असून, सूर्यदर्शन झालेले नाही. सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे अवकाळी पाऊस पडण्याची चिन्हे दुपारी २ वाजेच्या सुमारास या परिसरात हलका रिमझिम पाऊस पडल्यामुळे वातावरणात गारवा पसरला होता.

--------------------------

साईनगरात रस्ते झाले अरुंद

वाळूज महानगर : पंढरपुरातील साईनगरात नागरिकांनी घरासमोर अतिक्रमणे केल्यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. घरासमोर अतिक्रमण करून ओटे तसेच स्वच्छतागृहे बांधली आहेत. या अतिक्रमणांमुळे रस्ते अरुंद झाले असून ये-जा करणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहेत. याविरुद्ध ग्रामपंचायत प्रशासन कारवाई करण्यास धजावत नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

--------------------------

जोगेश्वरीत अंतर्गत रस्त्यावर खड्डे

वाळूज महानगर : जोगेश्वरीतील अंतर्गत रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. येथील न्यू आंबेडकरनगर, जुने गाव, जि.प.शाळा परिसर आदी भागातील अंतर्गत रस्त्यावरील खडी निखळून खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांत वाहने आदळत आहे. रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

--------------------------

नंदीग्राम मित्र मंडळ कार्यकारिणी जाहीर

वाळूज महानगर : वाळूज महानगरातील नंदीग्राम मित्र मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्ष - आय. जी. जाधव, कार्याध्यक्ष - बी. जी. गायकवाड, विजय उखळे, उपाध्यक्ष - यू. एम. किरतवाड, सचिव - एफ. बी. शेख, सहसचिव - शंकर नन्नुरे, विरभद्र वनशेट्टी, कोषाध्यक्ष - उत्तम चिकाळे, दत्तात्रय देशमुख, चरण खराडे, संघटक - आर. डी. जाधव, ज्ञानोबा तिडके, नागेश कुठारे, शिवाजी तुरटवाड, राहुल आंबटवाड, शेख हैदर, रामराव नरवडे, जे. टी. पवार, अरीफ पठाण, मार्गदर्शक - बालाजी शिंदे, बालाजी जाधव, संजय सांभाळकर, डॉ. अमर कोडगिरे, माधव पाटील आदी.

--------------------------

वाळूजला पालेभाज्या स्वस्त

वाळूज महानगर : वाळूजच्या आठवडी बाजारात पालेभाज्या स्वस्तात विक्री होत असल्यामुळे कामगार ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सोमवारी आठवडी बाजारात शेतकरी व विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात पालेभाज्या विक्रीसाठी आणल्या होत्या. मात्र, ढगाळ वातावरण व दुपारनंतर हलका पाऊस सुरू झाल्याने विक्रेत्यांनी कवडीमोल भावात पालेभाज्यांची विक्री केली.

--------------------------

बजाजनगरात सार्वजनिक स्वच्छतागृह उभारा

वाळूज महानगर : बजाजनगरात सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. उद्योगनगरीतील सर्वात मोठ्या कामगार वसाहतीत एकही सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्यामुळे महिला व नागरिकांची कुचंबणा होत आहे. कोलगेट चौकातील स्वच्छतागृह अतिक्रमण हटाव मोहिमेत पाडण्यात आले आहे. त्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्याची मागणी मंदा गाडेकर, सिद्राम पारे, सुरेश गाडेकर आदींनी केली आहे.

--------------------------

उद्योगनगरीत दिशादर्शक फलक लावा

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी परिसरातील अनेक सेक्टरमध्ये दिशादर्शक फलक नसल्यामुळे कामगार व व्यावसायिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. औद्योगिक क्षेत्रात रोजगाराच्या शोधात दररोज कामगाराची ये-जा सुरू असते. याशिवाय मालाची ने-आण करणाऱ्या वाहनांची सारखी वर्दळ असते. मात्र, सेक्टरमध्ये दिशादर्शक फलक नसल्यामुळे कंपन्यांचा शोध घेताना कामगार व वाहतूकदारांची चांगलीच दमछाक होत असते.

--------------------------

धोकादायक विद्युत डीपी हटवा

वाळूज महानगर : वाळूजकडून कमळापूरकडे जाणाऱ्या ट्रक टर्मिनललगत रस्त्याच्या बाजूला विद्युत डीपी आहे. या रस्त्यावर वाहनाची सतत ये-जा सुरू असल्याने डीपीवर वाहने धडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच बरोबर नागरी वसाहतीतील मुलेही या डीपीजवळ खेळत असल्यामुळे विजेचा धक्का लागण्याची भीती आहे. धोकादायक विद्युत डीपी हटविण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

---------------------- ----