शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत औरंगाबादच्या रिद्धी, सिद्धीची गोल्डन कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 01:04 IST

पुणे येथे नुकत्याच झालेल्या ५५ व्या कनिष्ठ राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत औरंगाबादच्या प्रतिभावान खेळाडू रिद्धी व सिद्धी हत्तेकर या जुळ्या बहिणींनी आपला विशेष ठसा उमटवताना पदकांची लूट केली. सिद्धी हत्तेकर हिने दोन सुवर्ण व एक रौप्यपदकाची कमाई केली, तर रिद्धीने एक सुवर्णपदक जिंकताना महाराष्ट्राच्या यशात निर्णायक योगदान दिले.

औरंगाबाद : पुणे येथे नुकत्याच झालेल्या ५५ व्या कनिष्ठ राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत औरंगाबादच्या प्रतिभावान खेळाडू रिद्धी व सिद्धी हत्तेकर या जुळ्या बहिणींनी आपला विशेष ठसा उमटवताना पदकांची लूट केली.सिद्धी हत्तेकर हिने दोन सुवर्ण व एक रौप्यपदकाची कमाई केली, तर रिद्धीने एक सुवर्णपदक जिंकताना महाराष्ट्राच्या यशात निर्णायक योगदान दिले. खेलो इंडियातही या जुळ्या बहिणींनी जबरदस्त कामगिरी केली होती. पुणे येथील नुकत्याच झालेल्या स्पर्धेत सिद्धी हत्तेकर हिने १५ वर्षांखालील मुलींच्या गटात टेबल व्हॉल्ट या साधन प्रकारात ११.५५ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. तसेच तिने अनइव्हन बार या साधन प्रकारात ७.९० गुणांसह रौप्यपदकाची कमाई केली. याच स्पर्धेत सिद्धी हत्तेकरने सांघिक सुवर्णपदकही जिंकले. रिद्धी हत्तेकर हिनेही सांघिक सुवर्णपदकाची कमाई केली. रिद्धी व सिद्धी या जुळ्या बहिणी शारदा मंदिर कन्या प्रशालेच्या दहावीच्या विद्यार्थिनी आहेत. सर्वसाधारण विजेतेपद स्पर्धेत सिद्धी हत्तेकरला चौथे राष्ट्रीय नामांकन व रिद्धी हत्तेकरला आठवे नामांकन मिळाले आहे. या दोघींना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रामकृष्ण लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल ‘साई’च्या संचालिका सुश्मिता ज्योत्सी, उपसंचालक व्ही. के. शर्मा, महाराष्ट्र जिम्नॅस्टिक संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे, सचिव व आंतरराष्ट्रीय पंच डॉ. मकरंद जोशी, क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, प्रशिक्षिका तनुजा गाढवे, पिंकी देब, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. संकर्षण जोशी, सचिव सागर कुलकर्णी, आदित्य जोशी, रणजित पवार, विशाल देशपांडे यांनी रिद्धी व सिद्धीचे अभिनंदन केले आहे.