शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

औरंगाबादच्या रिद्धी, सिद्धीने मुंबईत उमटवला ठसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 23:48 IST

गत केल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय व राज्य पातळीवर पदकांची लूट करणाºया औरंगाबादच्या प्रतिभावान जिम्नॅस्ट रिद्धी आणि सिद्धी हत्तेकर या जुळ्या बहिणींनी मुंबई येथील राज्य आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक अजिंक्यपद स्पर्धेत आपला विशेष ठसा उमटवला. या स्पर्धेत रिद्धीने तीन रौप्य, तर सिद्धीने दोन कास्यपदकांची लूट केली. या चमकदार कामगिरीमुळे या दोन्ही बहिणींनी राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघातील आपले स्थान निश्चित केले.

ठळक मुद्देराज्यस्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धा : एकूण पाच पदकांची केली लूट

औरंगाबाद : गत केल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय व राज्य पातळीवर पदकांची लूट करणाºया औरंगाबादच्या प्रतिभावान जिम्नॅस्ट रिद्धी आणि सिद्धी हत्तेकर या जुळ्या बहिणींनी मुंबई येथील राज्य आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक अजिंक्यपद स्पर्धेत आपला विशेष ठसा उमटवला. या स्पर्धेत रिद्धीने तीन रौप्य, तर सिद्धीने दोन कास्यपदकांची लूट केली. या चमकदार कामगिरीमुळे या दोन्ही बहिणींनी राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघातील आपले स्थान निश्चित केले.सिद्धीने एकूण ३६.४५ गुण नोंदवले. तिने टेबल वॉल्ट या वैयक्तिक प्रकारात ११.१७५ गुण, फ्लोअर एक्झरसाईजमध्ये ९.८५ गुणांसह रौप्यपदकाची कमाई केली. त्याचप्रमाणे सर्वोत्तम जिम्नॅस्टिक स्पर्धा प्र्रकारातही तिने उपविजेतेपद पटकावले. तिची बहीण रिद्धीनेदेखील तिच्या पावलावर पाऊल ठेवताना फ्लोअर एक्झरसाईजमध्ये वैयक्तिक कास्यपदक जिंकले. दुसरे कास्यपदक तिला सर्वोत्तम जिम्नॅस्टिक स्पर्धा प्रकारात मिळाले. या दोघींनाही रामकृष्ण लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले.या स्पर्धेत औरंगाबादच्या मुलांच्या संघाने जबरदस्त कामगिरी करताना सांघिक रौप्यपदक जिंकले. या संघात करण खारटमोल, आशिष शिंदे, व्यंकटेश अलकुंठे, आदित्य खोबे यांचा समावेश आहे.या यशाबद्दल सिद्धी व रिद्धी प्रवीण हत्तेकर आणि रौप्यपदक जिंकणाºया औरंगाबादच्या मुलांच्या संघाचे साईच्या पश्चिम विभागीय केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर, प्रशिक्षक अजितसिंग राठोड, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रामकृष्ण लोखंडे, पिंकी देब, राज्य जिम्नॅस्टिक संघटनेचे सचिव डॉ. मकरंद जोशी, प्रशिक्षक तनुजा गाढवे, रणजित पवार, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. संकर्षण जोशी, सचिव सागर कुलकर्णी, डॉ. विशाल देशपांडे, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, मुख्याध्यापिका सुरेखा देव आदींनी त्यांचे अभिनंदन केले.दोघींचीही खेलो इंडियासाठी निवडमुंबईत जबरदस्त कामगिरी करीत एकूण ५ पदकांची लूट करणाºया रिद्धी आणि सिद्धी हत्तेकर यांची दिल्लीत होणाºया 'खेलो इंडिया' जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारीदरम्यान खेळवली जाणार आहे. पुण्यात या स्पर्धेसाठी सुरू असलेल्या सराव शिबिरात त्या सराव करीत आहेत.