शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसाला पळवून नेण्याचा रिक्षाचालकाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 04:18 IST

कायद्याचा धाक नसलेल्या मुजोर रिक्षाचालकाने दादागिरी करीत कारवाई करण्यासाठी रिक्षात बसलेल्या वाहतूक पोलीस कॉन्स्टेबललाच पळवून नेण्याचा प्रयत्न केला.

औरंगाबाद : कायद्याचा धाक नसलेल्या मुजोर रिक्षाचालकाने दादागिरी करीत कारवाई करण्यासाठी रिक्षात बसलेल्या वाहतूक पोलीस कॉन्स्टेबललाच पळवून नेण्याचा प्रयत्न केला. सिग्नलवर रिक्षाचा वेग कमी होताच प्रसंगावधान राखत वाहतूक पोलिसाने रिक्षातून उडी घेऊन स्वत:ची सुटका करून घेतल्याची घटना गुरुवारी सायंकाळी मध्यवर्ती बसस्थानक ते मिलकॉर्नरदरम्यान घडली. एवढेच नव्हे, तर दुसºया दिवशी सायंकाळी पुन्हा त्या रिक्षाचालकाने पोलिसांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली आणि अंगावर रिक्षा घालण्याची धमकी देत तो पोलिसांसमोरून निघून गेला.रिक्षाचालक फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी पादचाºयावर दोन वेळा रिक्षा घालून त्याचा मोबाइल लुटल्याची खळबळजनक घटना घडली. पोलिसांनी त्या रिक्षाचालकाला अटक केली. त्यानंतर रिक्षाचालकाने पोलिसांवरच दादागिरी केल्याचे समोर आले. वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल आयनाथ सुक्रे गुरुवारी सायंकाळी मध्यवर्ती बसस्थानक येथे वाहतूक नियमन करीत असताना रस्त्याच्या मध्यभागी थांबलेल्या रिक्षाचे त्यांनी मोबाइलमध्ये छायाचित्र घेतले आणि रस्त्यावरील रिक्षा बाजूला घेण्याचे त्यांनी चालकाला सांगितले.तुला काय करायचे ते कर, असे उद्धटपणे सांगत रिक्षाचालकाने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. सुक्रे हे त्याच्या रिक्षात बसले आणि रिक्षा बाजूला घेण्याचे सांगत असताना चालक वेगात मिलकॉर्नरकडे रिक्षा नेऊ लागला. सुक्रे यांनी त्याला रिक्षा थांबविण्यास अनेकदा सांगितले. मात्र, त्यांना रिक्षातून तो पळवून नेऊ लागला. मिलकॉर्नरजवळ सिग्नलवर रिक्षाचा वेग कमी होताच सुक्रे यांनी रिक्षातून उडी घेतली होती.