शहरं
Join us  
Trending Stories
1
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
2
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
3
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
4
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
5
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
6
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
7
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
8
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
9
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
10
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
11
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
12
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
13
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
14
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
15
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
16
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
17
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
18
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
19
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
20
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू

‘शिक्षण, आरोग्य’साठी रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2017 23:05 IST

बीड : राष्ट्रवादीला धक्का देत महायुतीने जिल्हा परिषदेची सत्ता खेचून आणली; परंतु शिक्षण व आरोग्य खाते कोणाला द्यायचे? यावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे.

बीड : राष्ट्रवादीला धक्का देत महायुतीने जिल्हा परिषदेची सत्ता खेचून आणली; परंतु शिक्षण व आरोग्य खाते कोणाला द्यायचे? यावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. सोमवारी जि. प. ची सर्वसाधारण सभा होत असून यात अध्यक्षा विजया गोल्हार सभापतींना खातेवाटप करणार आहेत. विषय समित्यांसाठी सदस्य निवडले जाणार असून स्थायी समितीचीही स्थापना होणार आहे. त्यामुळे या सभेकडे जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.६० सदस्यीय जि.प. मध्ये संख्याबळाचे गणित जुळवून पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी होमपिचवर झालेल्या दारुण पराभवाची कसर भरुन काढली. महायुतीतील प्रत्येकाला सत्तेची चव चाखण्याची संधीही दिली. मात्र, शिक्षण व आरोग्य खात्यावरुन उपाध्यक्षा जयश्री राजेंद्र मस्के व सभापती राजेसाहेब देशमुख यांच्याच चढाओढ लागली आहे. अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडीवेळी समाजकल्याण सभापती म्हणून संतोष हंगे तर महिला बालकल्याण सभापतीपदी शोभा दरेकर यांची वर्णी लागली. अर्थ व बांधकाम, कृषी व पशुसंवर्धन, शिक्षण व आरोग्य या खात्याचे कारभारी निवडीचे अधिकार अध्यक्षांना आहेत. मात्र, या निवडी घोषित होण्यापूर्वीच सभापती युद्धजित पंडित व राजेसाहेब देशमुख यांनी आपल्या दालनाबाहेर समित्यांचा नामोल्लेख करुन नामफलक लावले. पंडित यांना अर्थ व बांधकाम खाते देण्याचा शब्द महायुतीच्या नेत्यांनी दिलेला आहे. उपाध्यक्ष कोणत्याही एका समितीचे पदसिद्ध सभापती असतात. त्यामुळे आता खरी स्पर्धा लागली आहे जयश्री मस्के व राजेसाहेब देशमुख यांच्यात. हे दोघेही शिक्षण व आरोग्य खात्यावर दावा करुन आहेत. मस्के यांनी तत्कालीन शिक्षण व आरोग्य सभापतींचे दालन मिळवून देशमुख यांना शह दिला तर देशमुख यांनीही आपल्या दालनाबाहेर शिक्षण व आरोग्य सभापतीची पाटी लावून त्यांना चोख उत्तर दिले. दरम्यान, शिवसंग्रामचे चार सदस्य असून राजेसाहेब देशमुख हे काँग्रेसचे आहेत. काँग्रेसकडे तीन सदस्य आहेत; परंतु राजेसाहेब देशमुख यांनी एकट्यानेच भाजपला साथ दिली आहे. त्यामुळे संख्याबळाचा निकष लावला तर शिक्षण व आरोग्य खाते आम्हाला मिळाले पाहिजे, असे भांडवल उपाध्यक्षांनी केले आहे. शिवाय आ. विनायक मेटे यांनी पालकमंत्री पंकजा मुुंडेंशी झालेल्या मतभेदानंतरही सत्ता स्थापनेसाठी सर्वांत आधी झाले गेले विसरुन मैत्रीचा हात पुढे केला. मेटे यांनी मस्केंसाठी प्रतष्ठा पणाला लावली आहे. दुसरीकडे राजेसाहेब देशमुख हे रमेश आडसकर यांचे ‘सोयरे’ आहेत. संख्याबळ जुळविताना व खास करुन माजी मंत्री सुरेश धस गटाचे पाच सदस्य भाजपकडे वळविताना त्यांची भूमिका ‘गेमचेंजर’ राहिलेली आहे. देशमुख यांनी पक्षादेश न जुमानता भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे देशमुख यांनाही दुर्लक्षून चालणार नाही. अशा परिस्थितीत पालकमंत्री पंकजा मुंडे कोणाचे नाव सूचवितात ? हे कोडे आहे. (प्रतिनिधी)