शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

नृत्याविष्काराने रसिक मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 01:17 IST

आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकार डॉ. स्वाती दैठणकर, व्ही. सौम्याश्री, हेमांगी पिसाट आणि निकिता बानावलीकर यांनी सादर के लेल्या नृत्याविष्काराने रसिक मंत्रमुग्ध झाले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकार डॉ. स्वाती दैठणकर, व्ही. सौम्याश्री, हेमांगी पिसाट आणि निकिता बानावलीकर यांनी सादर के लेल्या नृत्याविष्काराने रसिक मंत्रमुग्ध झाले. भरतनाट्यम्, ओडिसी, कुचीपुडी या शास्त्रीय नृत्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. निमित्त होते अक्षता प्रकाश कुलकर्णी स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित दशकपूर्ती महोत्सवाचे.यशवंतराव चव्हाण नाट्यमंदिरात आयोजित या महोत्सवाची रविवारी (दि.१७) सांगता झाली. याप्रसंगी डॉ. स्वाती दैठणकर यांनी भरतनाट्यम् या नृत्यशैलीद्वारे सीता, द्रौपदी या आजच्या काळात आल्या, तर काय म्हणतील, याचे अतिशय समर्पक सादरीकरण केले. ज्या गोष्टींना सीता सामोरे गेली, त्याच बाबींना आजच्या स्त्रीला सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीला डॉ. दैठणकर यांनी आपल्या नृत्याविष्कारातून एक प्रकारे वाचा फोडत उपस्थित रसिकांना क्षणभर विचार करण्यास भाग पाडले.महोत्सवाची सुरुवात ‘देवमुद्रा’च्या विद्यार्थिनींनी भरतनाट्यातून सादर केलेल्या गणेशवंदन, पुष्पांजलीने झाली. यानंतर हेमांगी पिसाट यांनी ओडिसी नृत्य सादर केले. यावेळी त्यांनी सावेरी पल्लवी नृत्य प्रकार आणि ओडिसीतील दशावतार, तर व्ही. सौम्याश्री यांनी कुचीपुडी, निकिता बानावलीकर यांनी कथ्थक सादर केले.महोत्सवात शनिवारी घेण्यात आलेल्या भारतीय शास्त्रीय नृत्य स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. स्पर्धेत प्रथम गिरिजा गोळे, द्वितीय रिद्धी बारपांडे, तर तृतीय क्रमांक ऐश्वर्या ताटी यांनी प्राप्त केला. ईशिता कुलकर्णी, श्रावणी मुंगी, अक्षता देशपांडे, मृणाल सोनवणे, अंकिता पाटील यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. यावेळी नृत्यगुरूंचा सत्कार करण्यात आला. महोत्सवासाठी डॉ. पी.एस. कुलकर्णी, विजय न्यायाधीश, गिरीश महाजन, स्वाती जोशी, योगेश्वरी शेवतेकर, सुधा न्यायाधीश आदींनी परिश्रम घेतले. रोहिणी पिंपळे-यादव, पूजा खैरनार यांनी सूत्रसंचालन केले. महोत्सवास मोठ्या संख्येने रसिकांची उपस्थिती होती.