शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

पाहणी दौºयात आश्वासनांची उजळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:31 IST

येथील रेल्वे स्थानकावरील रखडलेल्या प्रश्नांसंदर्भात दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे प्रबंधकांनी बुधवारी परभणी दौºयात मागील आश्वासनांचाच पुनरुच्चार केला़ १५ डिसेंबरपर्यंत परभणी स्थानकावरील एक्सलेटर आणि लिफ्टचे काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याने आता प्रवाशांना १५ डिसेंबरपर्यंतची प्रतीक्षा करावी लागणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील रेल्वे स्थानकावरील रखडलेल्या प्रश्नांसंदर्भात दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे प्रबंधकांनी बुधवारी परभणी दौºयात मागील आश्वासनांचाच पुनरुच्चार केला़ १५ डिसेंबरपर्यंत परभणी स्थानकावरील एक्सलेटर आणि लिफ्टचे काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याने आता प्रवाशांना १५ डिसेंबरपर्यंतची प्रतीक्षा करावी लागणार आहे़परभणी रेल्वे स्थानकावर अनेक असुविधा आहेत़ अरुंद दादरा, सरकता जिना (एक्सलेटर), लिफ्ट हे प्रश्न मागील वर्षभरापासून रखडले आहेत़ मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघ वेळोवेळी या प्रश्नांविषयी पाठपुरावा करीत आहे़ बुधवारी नांदेड विभागाचे रेल्वे व्यवस्थापक डॉ़ अखिलेश सिन्हा यांनी स्वतंत्र रेल्वेने नांदेड-परळी मार्गावरील रेल्वे स्थानकांची तपासणी केली़ सकाळी १० वाजेच्या सुमारास डॉ़ सिन्हा परभणीत पोहचले़ संपूर्ण स्थानकाची पाहणी केल्यानंतर त्यांनी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या पदाधिकाºयांसोबत चर्चा केली़ यावेळी स्थानकावरील समस्या त्यांच्यासमोर मांडल्या़ त्या यापूर्वीही अनेक वेळा मांडल्या होत्या़ त्यामुळे या वेळच्या दौºयात रेल्वे प्रबंधकांनी मागील दौºयात दिलेली आश्वासनेच यावेळीही दिली़ परभणी रेल्वे स्थानकावर १५ डिसेंबरपूर्वी लिफ्ट आणि सरकता जिना बसविला जाईल, असे त्यांनी सांगितले़पोखर्णी रेल्वे स्थानकावर वाढत्या चोरीच्या घटना लक्षात घेता या स्थानकावर रेल्वेचे थांबे बंद केले जातील, रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणानंतर रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडून गेले आहे़ या वेळापत्रकात सुसूत्रता आणण्यासाठी या मार्गावरून धावणाºया रेल्वेचा वेग ५० किमी प्रतितासावरून ८० किमी प्रतीतास केला जाईल़ प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर कोच लोकेटर बसविण्यासाठी निविदा मागविल्या असून, प्रक्रियेअंती हे काम पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले़यावेळी रेल्वेचे इतर अधिकारी उपस्थित होते़ रेल्वे प्रवासी महासंघाचे अरुण मेघराज, सुरेश नाईकवाडे, रितेश जैन आदींनी त्यांच्याशी चर्चा केली़