शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

विधिमंडळाची अनुसूचित जाती समिती औरंगाबाद जिल्हा परिषदेत घेणार योजनांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 14:08 IST

विधिमंडळाची अनुसूचित जाती कल्याण समिती आज सायंकाळी ४ ते ६ वाजेदरम्यान जिल्हा परिषदेत अनुसूचित जातीसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, तसेच कर्मचारी- अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बाबींचा आढावा घेणार आहे.

ठळक मुद्देविधिमंडळाच्या या समितीच्या दौऱ्यामध्ये सलग तीनवेळा बदल झाला आहे. आता ही समिती आजपासून शहरात येत आहे.

औरंगाबाद : विधिमंडळाची अनुसूचित जाती कल्याण समिती आज सायंकाळी ४ ते ६ वाजेदरम्यान जिल्हा परिषदेत अनुसूचित जातीसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, तसेच कर्मचारी- अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बाबींचा आढावा घेणार आहे. 

विधिमंडळाच्या या समितीच्या दौऱ्यामध्ये सलग तीनवेळा बदल झाला आहे. आता ही समिती आजपासून शहरात येत आहे. जिल्हा परिषदेतील अनुसूचित जातीच्या उमेदवारांची भरती, कर्मचाऱ्यांची पदोन्नती, आरक्षण, अनुशेष आणि जात पडताळणीविषयक प्रकरणे, तसेच अनुसूचित जातीतील नागरिकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, विशेष घटक योजनांबाबतचा आढावा ही समिती घेणार आहे. 

तथापि, यासंदर्भात जि.प. सदस्य रमेश गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेत मागासवर्गीय कक्ष सुरू करण्यात आला होता. सन २०१५ ते २०१७ पर्यंत या कक्षाचे नियमित कामकाज चालले; परंतु या कक्षात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची बदली आकसबुद्धीने करण्यात आली. तेव्हापासून (१७ मार्च ०१७) हा कक्ष बंद झाला आहे. या कक्षाने प्रशासनामार्फत राबविण्यात आलेल्या अनेक चुकीच्या बाबी निदर्शनास आणल्या. अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या बिंदुनामावली अद्ययावत करणे, सेवाविषयक बाबी, सरळसेवा भरती, पदोन्नती, कालबद्ध पदोन्नती, ज्येष्ठता यादी अद्ययावत करण्याचे काम केले. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल जाणीवपूर्वक लिहिले जात नाहीत, त्यामुळे ऐनवेळी पदोन्नती समितीकडून मागासवर्गीय कर्मचारी ज्येष्ठता यादीमध्ये असतानाही केवळ गोपनीय अहवाल नाही म्हणून त्याला डावलण्यात आल्याच्या बाबी मागासवर्गीय कक्षाने उघडकीस आणल्या होत्या. यासह समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या अनेक योजनाही मागील वर्षापासून योग्य प्रकारे राबविल्या जात नाहीत. याबाबी विधिमंडळाच्या समितीने  गांभीर्याने विचारात घेतल्या पाहिजेत, असे गायकवाड म्हणाले.

समितीमधील आमदार अनुसूचित जाती कल्याण समितीमध्ये १५ आमदार असून, आ. हरीश पिंपळे हे समितीचे अध्यक्ष आहेत. आ. लखन मलिक, आ. डॉ. मिलिंद माने, आ. राजू तोडसाम, आ. संगीता ठोंबरे, ज्ञानराज चौगुले, आ. डॉ. बालाजी किणीकर, आ. गौतम चाबूकस्वार, आ. धनाजी अहिरे, आ. संध्या देसाई-कुपेकर, आ. वर्षा गायकवाड, आ. भाई गिरकर, आ. प्रकाश गजभिये, आ. जोगेंद्र कवाडे, आ. कपिल पाटील हे सदस्य आहेत.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदState Governmentराज्य सरकारgovernment schemeसरकारी योजना