शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

मुख्य सचिवांकडून पीक परिस्थितीचा आढावा

By admin | Updated: November 4, 2014 01:39 IST

औरंगाबाद : पिकांची सुधारित आणेवारी निश्चित करण्यासाठी विभागात आतापर्यंत महसूल विभागाकडून पीक कापणीचे साडेपाच हजार प्रयोग झाले आहेत, अशी माहिती मुख्य सचिवांच्या आढावा बैठकीत

औरंगाबाद : पिकांची सुधारित आणेवारी निश्चित करण्यासाठी विभागात आतापर्यंत महसूल विभागाकडून पीक कापणीचे साडेपाच हजार प्रयोग झाले आहेत, अशी माहिती मुख्य सचिवांच्या आढावा बैठकीत आज प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. १५ नोव्हेंबरपूर्वी सुधारित आणेवारी जाहीर करण्याच्या दृष्टीने आवश्यक पावले उचलावीत, अशा सूचना यावेळी मुख्य सचिवांनी दिल्या.राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी आज मंत्रालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मराठवाड्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेतला. विभागीय आयुक्त कार्यालयातून विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासह कृषी, जलसंपदा आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी मराठवाड्यातील परिस्थितीविषयी माहिती सादर केली. सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय अनेक गावांत पाणीटंचाई जाणवू लागली आहे. प्रशासनाने औरंगाबाद, जालना, लातूर आणि बीड जिल्ह्यांतील टंचाईग्रस्त गावांना २७ टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. टंचाई परिस्थिती लक्षात घेता वेळेवर आणेवारी जाहीर करण्यासाठी पावले उचलावीत, त्यासाठी लवकरात लवकर पीक कापणीचे प्रयोग घ्यावेत, अशी सूचना मुख्य सचिवांनी केली. आतापर्यंत विभागात महसूल खात्यातर्फे पीक कापणीचे साडेपाच हजार प्रयोग घेण्यात आले असून, उर्वरित ठिकाणी प्रयोग घेण्याची कारवाई सुरू असल्याचे याप्रसंगी विभागीय आयुक्तांनी सांगितले. खरिपाच्या सर्व पिकांच्या कापणीचे प्रयोग घेऊन १५ नोव्हेंबर रोजी सुधारित आणेवारी जाहीर केली जाणार आहे, तर अंतिम आणेवारी डिसेंबर महिन्यात जाहीर केली जाईल. या बैठकीला मंत्रालयात मुख्य सचिवांसोबत कृषी आणि पुनवर्सन विभागाचे सचिवही उपस्थित होते, तर विभागीय आयुक्त कार्यालयात महसूल उपायुक्त जितेंद्र पापळकर, कृषी विभागाचे सहायक संचालक जनार्दन जाधव, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एन.व्ही. शिंदे यांच्यासह स्थानिक अधिकारी उपस्थित होते. आणेवारी काढण्यासाठी महसूल विभाग पीक कापणीचे प्रयोग घेत आहे. दुसरीकडे कृषी विभागानेही शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यासाठी कापणीचे प्रयोग सुरू केले आहेत. मात्र, कृषी विभागाने आतापर्यंत विभागात मूग, उडीद आणि सोयाबीन या तीन पिकांचे केवळ ८७० प्रयोग घेतले आहेत, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.