शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शांतीगिरी महाराजांसोबत महसूलमंत्र्यांचे स्नेहभोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:46 IST

२००९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे यांना जेरीस आणणारे शांतीगिरी महाराज यांच्यासोबत महसूल, बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी तब्बल दीड तास घालविला.

विकास राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : २००९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे यांना जेरीस आणणारे शांतीगिरी महाराज यांच्यासोबत महसूल, बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी तब्बल दीड तास घालविला. पूजापाठ, अभिषेकानंतर या उभयतांनी सोबत स्नेहभोजनही केले. धार्मिक व्यासपीठावरील या राजकीय स्नेहभोजनाचा सुगंध आगामी निवडणुकांमध्ये कसा दरवळणार, याची उत्सुकता आता लागलेली आहे. कन्नडच्या शिवसेना आमदाराला ५ कोटींची आॅफर पक्षांतरासाठी दिल्यानंतर उठलेल्या वादळाची धूळ खाली बसेपर्यंत पाटील औरंगाबादला येऊन जातात यामागे काहीतरी शिजत असल्याचे स्पष्ट होत आहे.शांतीगिरी महाराज सध्या जरी राजकारणातून अलिप्त असले तरी त्यांचा ‘भक्त परिवार’ खूप मोठा आहे. जिल्ह्यातील वैजापूर, कन्नड, गंगापूर आणि अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांत त्यांचे नेटवर्क आहे. १५ मिनिटांचा वेळ वेरूळ येथील जनार्दनस्वामी आश्रम भेटीसाठी ठेवण्यात आला होता; परंतु १५ मिनिटांचे केव्हा दीड तास झाले हे कळलेही नाही. बांधकाम मंत्री आणि शांतीगिरी महाराज यांच्यातील चर्चा गुप्त ठेवण्यात आली असली तरी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जी मोर्चेबांधणी सुरू केली आहे, त्याचाच हा भाग असावा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात  आहेसतीश चव्हाण यांचीही घेतली भेटचंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पाटील यांनी चव्हाण यांची घरी जाऊन भेट घेण्यामागे काय राजकारण आहे, असा तर्क लावला जात आहे. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील रस्ते, शेतकरी कर्जमाफी आणि युवकांच्या प्रश्नांवर चर्चा झाल्याचे आमदार चव्हाण यांच्याकडून सांगण्यात येत आहे. यासंदर्भात आ. चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.नवउद्योजकांशी केली चर्चाअ‍ॅड. श्रीकांत अदवंत यांच्या निवासस्थानी नवउद्योजकांशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर वास्तुविशारद सुशील देशमुख यांच्या निवासस्थानी मसिआ, उद्योजक, व्यावसायिकांसोबत त्यांनी बैठक घेतली, तसेच किशोर शितोळे यांच्या निवासस्थानी त्यांनी हजेरी लावली. शिवाय हर्सूल येथील सतीश वेताळ यांच्याकडेही पाटील यांनी बैठक घेतली. सरकारकडून सामान्यांच्या काय अपेक्षा आहेत, याचा आढावा घेण्यासाठी त्यांनी या नागरिकांशी चर्चा केली. मराठा समाजाच्या विविध संघटना पदाधिका-यांशी चर्चा करून विविध योजनांची माहिती त्यांनी दिली, असे पाटील यांच्या कोअर ग्रुपमधून सांगण्यात आले.