शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

गंगाखेडमध्ये महसूल, पोलीस प्रशासनातील वाद विकोपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:57 IST

दत्तमंदिर चौक परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाºया वाहनांविरुद्ध कारवाई करण्यासाठी नेमलेल्या पथकातील तलाठी शिवाजी मुरकुटे व पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट यांच्यात वाद झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पोलीस व महसूल प्रशासनातून आरोप-प्रत्यारोप होत असल्याने वाद विकोपाला गेल्याचे ेदिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड: दत्तमंदिर चौक परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाºया वाहनांविरुद्ध कारवाई करण्यासाठी नेमलेल्या पथकातील तलाठी शिवाजी मुरकुटे व पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट यांच्यात वाद झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पोलीस व महसूल प्रशासनातून आरोप-प्रत्यारोप होत असल्याने वाद विकोपाला गेल्याचे ेदिसत आहे.गंगाखेड शहरातील दत्तमंदिर परिसरात मुंजाजी नागरगोजे यांच्या खाजगी गोदामासमोर ८ सप्टेंबर रोजी पोलीस पथकाने छापा टाकून काळ्या बाजारात जाणारा गहू पकडला होता. या घटनेचा पंचनामा सुरु असताना महसूल पथकातील तलाठी शिवाजी मुरकुटे व पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट यांच्यात वाद झाला. पोलीस निरीक्षकांनी मारहाण केल्याचा आरोप तलाठी मुरकुटे यांनी केला. तर दुसीरकडे ६ सप्टेंबर रोजी तहसीलदारांनी काढलेल्या आदेशानुसार तलाठी मुरकुटे हे पथकात नियुक्तीवर नसल्याचे समोर आले आहे, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. तलाठी मुरकुटे खाजगी वाहनातून मुलांसोबत धान्य पकडलेल्या ठिकाणी कशासाठी आले, असा प्रश्न पोलिसांनी उभा केला. त्यामुळे दोन्ही विभागात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु आहे.