शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

महसूल विभाग हादरला; विभागीय आयुक्तालय कोरोनाच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 20:18 IST

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचीदेखील अँटिजन टेस्ट करण्यात आली, तर आयुक्तालयाच्या व्हरांड्यात सर्व कर्मचाऱ्यांच्या अँटिजन टेस्ट करण्यासाठी सहायक आयुक्त शिवाजी शिंदे यांनी मनपाचे पथक बोलाविले होते.

ठळक मुद्देउपायुक्तांसह दोघांना लागणतर ७६ जण हायरिस्क संपर्कात 

औरंगाबाद : विभागातील कोरोनावर उपाययोजनांची पाहणी आणि संचिकांची हाताळणी करताना शेवटी विभागीय आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत कोरोना पोहोचला. चार महिन्यांपासून सुरक्षा साधनांचा वापर करून सामान्यांसाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनादेखील कोरोनाने ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठविली. महसूल उपायुक्त पराग सोमण यांच्यासह एका नायब तहसीलदाराचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून, आयुक्तालयातील सुमारे १८० जणांची तातडीने अँटिजन टेस्ट करण्यात आली. 

उपायुक्त सोमण यांच्या संपर्कात आलेल्या ७६ जणांची हायरिस्क म्हणून आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचीदेखील अँटिजन टेस्ट करण्यात आली, तर आयुक्तालयाच्या व्हरांड्यात सर्व कर्मचाऱ्यांच्या अँटिजन टेस्ट करण्यासाठी सहायक आयुक्त शिवाजी शिंदे यांनी मनपाचे पथक बोलाविले होते. तसेच आयुक्तालयाच्या सर्व परिसरात औषधी फवारणी करण्यात आली. सकाळपासून आयुक्तालयात सामान्यांना प्रवेश बंद करण्यात आला होता. शनिवारी आणि रविवार सुटी असल्यामुळे आयुक्तालय बंद राहणार आहे. सोमवारपर्यंत आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. 

त्यांचा हायरिस्क कॉन्टॅक्टविभागीय आयुक्त केंद्रेकर यांच्यासह उपायुक्त सोमण, उपायुक्त वर्षा ठाकूर, डॉ. विजयकुमार फड यांच्यासह अनेक अधिकारी दररोज कोणत्या ना कोणत्या बैठकीसाठी आयुक्तालयात हजर राहतात. त्यामुळे या सर्व अधिकाऱ्यांसह महसूल शाखेतील कर्मचारी शुक्रवारी सकाळपासूनच धास्तावले. दरम्यान, सोमण हे पुण्याला जाऊन आल्यामुळे त्यांना तिकडूनच लागण झाल्याचे प्रथमदर्शनी बोलले जात आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद