शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘महसूल’, ‘आरोग्य’च्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By admin | Updated: July 15, 2014 00:54 IST

उस्मानाबाद : विविध प्रलंबित मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील महसूल विभागातील वर्ग ३ व ४ चे कर्मचारी तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आज आंदोलन केले.

उस्मानाबाद : विविध प्रलंबित मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील महसूल विभागातील वर्ग ३ व ४ चे कर्मचारी तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आज आंदोलन केले. या आंदोलनामुळे दोन्ही विभागांचे कामकाज दिवसभर ठप्प झाले होते. महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यात याव्यात, यासाठी संघटनेच्या वतीने १ जुलै रोजी काळ्या फिती लाऊन कामकाज करून जवणाच्या सुटीत जिल्ह्याच्या ठिकाणी निदर्शनेही करण्यात आली होती. तसेच यानंतर ९ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन धरणे आंदोलन करण्यात आले. परंतु, मागण्यांबाबत शासनाकडून काहीच प्रतिसाद मिळाला नसल्याने सोमवारी एक दिवसाचे लेखणीबंद आंदोलन करून निदर्शने करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे दिवसभर महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले होते. या आंदोलनात कार्याध्यक्ष सी. व्ही. शिंदे, सहसचिव डी. एम. मोरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, सभासद महसूल वाहन चालक संघटना तसेच चतुर्थश्रेणी महसूल कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य सहभागी झाले होते. दरम्यान, हेच प्रश्न घेऊन १ आॅगस्टपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसण्यात येणार असल्याचे संघटनेने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, भूम येथेही संघटनेच्या वतीने आंदोलन करून तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात ए. एम. जाधवर, एस. सी. गलांडे, एस. जी. कवडे, टी. एस. गलांडे, एस. डी. वाघमारे, एस. डी. कुलकर्णी, एस. के. जाधव, बी. व्ही. साळुंके, ए. एम. पवार, मोहन अढागळे आदी सहभागी झाले होते. जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीनेही सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. डॉ. आनंदे समितीच्या अहवालानुसार कार्यवाही करावी, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतनत्रुटी दूर कराव्यात, हिवताप विभागातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदलीचे अधिकार सहाय्यक संचालकांना द्यावेत, अर्धवेळ स्त्री परिचारिकांना किमान वेतनानुसार दहा हजार रूपये मिळावेत तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना शासन सेवेत सामावून घ्यावे, आदी मागण्यांसाठी हे आनदोलन करण्यात आले. याच मागण्या घेऊन १६ जुलैपासून मुंबई येथे मोर्चा व सत्यागृह आंदोलनही सुरू करण्यात येणार असल्याचे संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आंदोलनात राज्य अध्यक्ष अरूण खरमाटे, कार्यकारी अध्यक्ष प्रमिला कुंभारे, सरचिटणीस अशोक जयसिंगपुरे, महासचिव ए. एस. सपकाळे यांच्यासह जिल्हाध्यक्ष शरद मुंडे, संघटक मदन जाधव, कोषाध्यक्ष एल. डी. सतार, तानाजी क्षीरसागर, ए. एच. पठाण, सुनील मिसाळ, सुनील डावकरे आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)