जालना : दिवाळीच्या सुट्ट्या संपवून खाजगी व शासकीय नोकरदार आता परतीच्या दिशेने निघाले आहेत. यामुळे मागील दोन दिवसांपासून बस व रेल्वे स्थानक प्रवाशांच्या गर्दीने गजबजून गेले आहेत. प्रवाशांचे हाल होणार नाहीत, यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. तर रेल्वेमध्ये प्रवाशांची संख्या वाढली आहे.दिवाळी सणाची आनंद द्विगुणीत करण्यासाठी बाहेरगावी असणारा प्रत्येकजण आपल्या घरी येत असतो. तर काही लोक आपल्या नातेवाईकांकडे जातात. चिमुकले आपली दिवाळी मामा, मावशी, आजी, आजोबा, काका यांच्या घरी साजरी करतात. त्यामुळे ये-जा करण्यासाठी गर्दी वाढते. (प्रतिनिधी)
परतीच्या प्रवाशांनी बस, रेल्वे स्थानक गजबजले
By admin | Updated: November 7, 2016 00:31 IST