शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कराचे साडेचौदा लाख ग्रामपंचायतीला परत द्या

By admin | Updated: June 16, 2014 01:17 IST

उस्मानाबाद : धाराशिव कारखान्याकडील कर म्हणून वसूल केलेल्या रक्कमेतील साडेचौदा लाख रूपये चोराखळी ग्रामपंचायतीला देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत़

उस्मानाबाद : धाराशिव कारखान्याकडील कर म्हणून वसूल केलेल्या रक्कमेतील साडेचौदा लाख रूपये चोराखळी ग्रामपंचायतीला देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत़ या निर्णयामुळे चोराखळी ग्रामपंचायतला मोठा निधी उपलब्ध होणार असून, याद्वारे गावातील विविध विकास कामे करण्यात येणार असल्याचे तत्कालीन सरपंच अ‍ॅड़ मिराजी मैंदाड यांनी सांगितले,याबाबत अ‍ॅड़मिराजी मैंदाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंब तालुक्यातील चोराखळी गावच्या शिवारात धाराशिव साखर कारखान्याची निर्मिती झाल्यानंतर तत्कालीन सरपंच अ‍ॅड़ मिराजी मैंदाड यांनी मालमत्ता कर ग्रामपंचयतीला मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू केला होता़ पंचायत समितीपासून ते ग्रामविकास मंत्रालयस्तरावरही ग्रामपंचयतीच्या बाजूने निर्णय देण्यात आला होता़ तर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी कारखान्याकडून २८ लाख,९८ हजार २७५ रूपये वसूल केले़ मात्र, कारखान्याने यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती़ त्यामुळे वसूल झालेली रक्कम जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यावर ठेवण्यात आली होती़ याबाबत औरंगाबाद खंडपीठाने वसूल रक्कमेपैकी ५० टक्के रक्कम चोराखळी ग्रामपंचायतीकडे जमा करण्याचे व उर्वरित रक्कम औरंगाबाद खंडपीठात जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत़ याप्रकरणी ग्रामपंचायतच्या वतीने अ‍ॅड़ सुशात चौधरी, अ‍ॅड़सागर फटाळे यांनी, जिल्हा परिषदेकडून अ‍ॅड़प्रशांत दामा, अ‍ॅडग़णेश कोरे तर शासनाकडून व्ही़ए़शिंदे यांनी काम पाहिले़ या प्रकरणाची अंतीम सुनावणी २१ जून रोजी होणार असल्याचेही अ‍ॅड़मैंदाड यांनी सांगितले़ दरम्यान, या निधीमुळे गावातील विकास कामे करण्यास मदत होणार असल्याचे म्हटले जात आहे़ (प्रतिनिधी)