शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या उमेदवाराची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:44 IST

महापालिका निवडणुकीत परिवर्तनाची हाक देणाºया भाजपाला संपूर्ण ८१ जागेवर उमेदवार मिळाले नाहीत. भाजपाचे मनपा निवडणुकीत ८० उमेदवार रिंगणात असून काँग्रेसकडेच संपूर्ण ८१ जागेवर उमेदवार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिका निवडणुकीत परिवर्तनाची हाक देणाºया भाजपाला संपूर्ण ८१ जागेवर उमेदवार मिळाले नाहीत. भाजपाचे मनपा निवडणुकीत ८० उमेदवार रिंगणात असून काँग्रेसकडेच संपूर्ण ८१ जागेवर उमेदवार आहेत.निवडणूक प्रक्रियेत गुरुवारी रिंगणातील उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. त्यात पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांना चिन्ह वाटप करण्यात आले. रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये काँग्रेसचे ८१, भारतीय जनता पार्टीचे ८०, शिवसेना ६३, राष्ट्रवादी काँग्रेस ५५, एमआयएम ३२, बहुजन समाज पार्टी १७ आणि इतर राज्यस्तरीय, प्रादेशिक पक्ष तसेच अपक्ष मिळून २५३ उमेदवारांचा समावेश आहे.मनपा निवडणुकीत सर्व जागांवर उमेदवार देणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष ठरला आहे. भारतीय जनता पार्टीला एका ठिकाणी उमेदवार मिळाला नाही. प्रभाग १२ ड मध्ये भाजपाचा उमेदवार नाही. भाजपाने या ठिकाणी एका उमेदवारास बी फॉर्म दिल्यानंतरही त्या उमेदवाराने उमेदवारीच दाखल केली नसल्याची बाब स्पष्ट झाली आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, एमआयएम, बसपा आदी पक्षांनाही सर्व जागी उमेदवार देता आले नाहीत. या सर्व उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले.निवडणूक रिंगणातील सर्व उमेदवारांना दररोज खर्च दाखल करावा लागणार आहे. ट्रू वोटर अ‍ॅपद्वारेही तो सबमीट करायचा आहे. जे उमेदवार आपला रोजचा खर्च दाखल करणार नाहीत त्यांचेवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही आयुक्त गणेश देशमुख यांनी दिला आहे.दरम्यान, मनपा निवडणुकीसाठी ५५० मतदान केंद्रे निश्चित करण्यात आले आहेत. मनपा निवडणुकीत ३ लाख ९६ हजार ८७२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी ३ हजार ६२७ अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.राज्यात पहिल्यांदाच व्हीव्हीपॅट मशिनचा वापर नांदेडमध्ये केला जाणार आहे. प्रभाग २ मधील संपूर्ण ३३ मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट मशिन बसवली जाणार आहे. या मशिनद्वारे मतदारांना आपण कुणाला मतदान केले हे व्हीव्हीपॅटद्वारे पाहता येणार आहे.