याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणाचा गुन्हे शाखेकडून समांतर तपास करण्यात येत होता. गुन्हे शाखेला गुप्त बातमीदाराकडून, सेवानिवृत्त पोलिसाला मारहाण करून लुटणारा हा कमल परमार असल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार त्यास शनिवारी दुपारी चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याच्या घरी जाऊन अधिक तपासणी केली असता, गुन्ह्यात नमूद मोबाइल व कागदपत्रे आढळून आली. हा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपीस पुढील तपासकामी क्रांती चौक पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अजबसिंग जारवाल, पोलीस कर्मचारी शेख हबीब, विजय निकम, राजेंद्र साळुंके, विठ्ठल सुरे, संदीप सानप, नितीन देशमुख, प्राजक्ता वाघमारे आणि चालक कांबळे यांच्या पथकाने केली.
सेवानिवृत्त पोलिसाला मारहाण करून लुटणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:04 IST