शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

‘सीबीएसई’ १२वीचा निकाल जाहीर

By admin | Updated: May 22, 2016 00:40 IST

औरंगाबाद : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल शनिवारी दुपारी आॅनलाईन जाहीर झाला. यंदाच्या निकालातही पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली.

औरंगाबाद : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल शनिवारी दुपारी आॅनलाईन जाहीर झाला. यंदाच्या निकालातही पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली. १ मार्च ते २२ एप्रिल २०१६ या कालावधीत झालेली ही परीक्षा औरंगाबादेतील जवळपास अडीचशे ते तीनशे विद्यार्थ्यांनी दिली होती. शहरातील जैन इंटरनॅशनल, रेव्हरडेल स्कूल, स्टेपिंग स्टोन, केंद्रीय विद्यालय, नाथ व्हॅली, पोदार इंटरनॅशनल आणि पद्मश्री शंकरबापू आपेगावकर स्कूल या शाळांनी यशाची परंपरा यंदाही कायम राखली आहे. दुपारी १२ वाजता आॅनलाईन निकाल जाहीर होताच संबंधित शाळांचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक या सर्वांनी एकाच वेळी इंटरनेटवर निकाल पाहण्याची घाई केली. त्यामुळे सातत्याने निकालाची वेबसाईट हँग होत होती. वेबसाईटवर निकाल पाहताच यशस्वी विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. रेव्हरडेलचा शंभर टक्के निकालरेव्हरडेल शाळेने यंदाही बारावी परीक्षेत निकालाची यशस्वी परंपरा कायम राखली. या शाळेचे विद्यार्थी प्रीतम शिर्के आणि आदित्य सोनी यांनी ९३.४ टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा मान पटकावला. अभिनव बैद याने ९३.२ टक्के , सचित सहेगल याने ९२.६ टक्के आणि सुश्मिता देऊळगावकर हिने ९०.२० टक्के गुण मिळविले आहेत. या शाळेतील प्रीतम शिर्के, सचित सेहगल, सुश्मिता देऊळगावकर आणि अनुषा जेथवानी या विद्यार्थ्यांनी संगीत शास्त्रात १०० पैकी १०० गुण मिळविले आहेत.नाथ व्हॅली स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेतून सिरत निऱ्ह हिने ९६.२ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळविला. दाऊम जंग आणि आरुष बोहरा ९५.६ टक्के गुण घेतले असून, ते दोघेही द्वितीय आले आहेत. विज्ञान शाखेतून अनंत काळे हा ९४.४ टक्के गुण घेऊन प्रथम आला. प्रभ्लीन बिंद्रा हिने ९४.२ टक्के गुण घेतले असून, ती द्वितीय, तर ९४ टक्के गुण घेऊन कोमल सोनवणे आणि जय थिरानी हे तृतीय आले आहेत. अमृता छटवाल आणि सिरत निऱ्ह या दोघींनी इंग्रजी विषयात सर्वाधिक ९७ गुण, अर्थशास्त्र विषयात श्रेया ग्रामले आणि रिधिमा लहरिया या दोघींनी ९७ आणि आयुष बोहरा याने गणित विषयात ९६ गुण प्राप्त केले आहेत. प्राचार्य रंजित दास यांनी यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले आहे.