शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्याचा निकाल १९ टक्क््यांनी वाढला

By admin | Updated: June 18, 2014 01:29 IST

नांदेड : येथील केंब्रिज विद्यालयाची चारुशिला ब्रह्मानंद गिरी हिने ९९ टक्के गुण मिळवून लातूर विभागात अव्वल येण्याचा मान मिळविला आहे़

नांदेड : येथील केंब्रिज विद्यालयाची चारुशिला ब्रह्मानंद गिरी हिने ९९ टक्के गुण मिळवून लातूर विभागात अव्वल येण्याचा मान मिळविला आहे़आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार चारूशिलाचे गुण सर्वाधिक आहेत़ तर सचिन बाबुराव जाधव या विद्यार्थ्याने ९८़८० टक्के गुण मिळविले आहेत़ तसेच इंग्रजी माध्यमात सय्यद उबेद अली हा ९६़२० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आला़ आहे. याही वर्षी केंब्रिजने निकालाचा उच्चांक गाठला आहे़ दरम्यान, शालांत परीक्षेत नांदेड जिल्ह्याचा निकाल ७४़२९ टक्के लागला़ गत वर्षीच्या तुलनेत निकालाची टक्केवारी १८़८९ टक्क्यांनी वाढली आहे़ कॉपीमुक्ती अभियानानंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता उत्तरोत्तर वाढत असल्याचे टक्केवारीवरुन स्पष्ट होते़ बारावी परीक्षेपाठोपाठ दहावी परीक्षेतही टक्केवारीच्या बाबतीत मुलींचा वरचष्मा कायम राहिला़ जिल्ह्यातील ६२० शाळातून ३६ हजार ११८ विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेसाठी नोंदणी केली़ यापैकी ३५ हजार ८६७ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली़ एकुण २६ हजार ६४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ यात १४ हजार २२८ मुले तर १२ हजार ४१९ मुलींचा समावेश आहे़ मुले उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ७१़८२ तर मुलींचे प्रमाण ७७़३५ टक्के आहे़ दहावीसाठी ५८६ शाळांतून ७ हजार ८२७ विद्यार्थी पुनर्रप्रविष्ट होते़ यापैकी १०९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ पहिल्यांदाच दहावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी ५ हजार २७ जण विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले़ ८ हजार १०५ विद्यार्थी प्रथम श्रेणी, १० हजार ३२४ द्वितीय श्रेणी तर ३ हजार १९१ विद्यार्थी सर्वसाधारण श्रेणीत उत्तीर्ण झाले़ जिल्ह्यातील १८ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला़ तर पाच शाळांचा निकाल शून्य टक्के लागला़ यात जि़प़ हायस्कूल, मुखेड, नुरजहाँ उर्दू माध्यमिक शाळा, नायगाव, जय महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय रिसनगाव ता़ लोहा, जिल्हा परिषद मुलांचे हायस्कूल कंधार व संत ज्ञानेश्वर विद्यालय हंगिरगा ता़ उमरी या शाळांचा समावेश आहे़ तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ़ श्रीकर परदेशी यांनी चार वर्षापूर्वी जिल्ह्यात कॉपीमुक्ती अभियान राबविले़ परिणामी दहावी, बारावीच्या निकालात घसरण झाली़ गुणवत्तेला पर्याय नसल्याची बाब समोर आल्यावर विद्यार्थी जोमाने अभ्यासाला लागले़ त्यामुळे गुणवत्ता वाढीस लागली असून यात उत्तरोत्तर वाढ होत आहे़ २०१२ मध्ये दहावीचा निकाल ५३़७५ टक्के लागला़ २०१३ मध्ये ही आकडेवारी ५५़४० टक्क्यांवर पोहोचली़ २०१२ व १३ या वर्षात निकाल २ टक्क्यांनी वाढला़ यंदा दहावीच्या निकालात गतवर्षीच्या तुलनेत १८़८९ टक्क्यांची घसघसीत वाढ झाल्याचे दिसून येते़ विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होणाऱ्यांत मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण अधिक आहे़ विशेषत: ग्रामीण भागातील मुली गुणवत्तेच्या बाबतीत मुलांपेक्षा सरस ठरल्या आहेत़ (प्रतिनिधी)१८ शाळांचा १०० टक्के निकालजिल्ह्यातील १८ शाळांचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे़ शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळा पुढीलप्रमाणे-युनिव्हर्सल इंग्लिश माध्यमिक प्रशाला नांदेड, हजरत फातेमा कन्या विद्यालय नांदेड, सांदिपनी पब्लिक स्कूल, लिटल स्कॉलर्स पब्लिक स्कूल, होलिसीटी पब्लिक स्कूल, टायनी एंजल्स स्कूल, राजर्षी पब्लिक स्कूल, लीटल पावर कॉनव्हेंट स्कूल बिलोली, ज्ञानसरस्वती इंग्लिश स्कूल रामपूर, देगलूर, शांतीदूत जी़ पाटील माध्यमिक विद्यालय, खानापूर ता़ देगलूर, सरस विद्यालय इंग्रजी माध्यम मांडवी, कै़ प्रल्हादरावजी गरुड माध्यमिक विद्यालय इस्लापूर, श्री डी़ देशमुख मा़ विद्यालय, कंडाळा ता़ नायगाव, ब्लू बेल्स इंग्लिश स्कूल नायगाव या शाळांचा समावेश आहे़