शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
4
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
5
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
6
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
7
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
8
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
9
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
10
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
11
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
12
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
13
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
14
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
15
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?
16
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
17
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
18
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
19
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
20
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

परीक्षांचे निकाल वेळेत

By admin | Updated: May 31, 2016 00:42 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मार्च-एप्रिलमध्ये घेतलेल्या जवळपास सर्वच परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून,

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मार्च-एप्रिलमध्ये घेतलेल्या जवळपास सर्वच परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून, तीन ते चार विषयांचे निकालही येत्या दोन ते तीन दिवसांत जाहीर होणार आहेत. मागील चार ते पाच वर्षांत विद्यापीठाने मे महिन्यात निकाल देण्याची ही पहिलीच वेळ असल्याने विद्यार्थ्यांमध्येही समाधान व्यक्त होत आहे. बी. ए. चे (सर्व सत्रांचे) निकाल सोमवारी सायंकाळी घोषित करण्यात आले. तर बी. एस्सी. (सहावे सत्र) अंतिम वर्षाचा निकाल ६६ टक्के लागला आहे. परीक्षा दिलेल्या १४,३६२ विद्यार्थ्यांपैकी ९,६६८ जण उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. डी. एम. नेटके यांनी दिली. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी यंदा सर्व परीक्षा वेळेआधी सुरू करण्याच्या तसेच निकाल वेळेवर लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. पदवी आणि काही पदव्युत्तर परीक्षांचे निकाल विद्यापीठाने आतापर्यंत जाहीर केले आहेत. यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेशाचे, सीईटीचे नियोजन करता येणे शक्य होणार आहे. अभियांत्रिकीचे निकाल १५ जुलैपर्यंतदरम्यान, अभियांत्रिकी निकालासंदर्भात सोमवारी विद्यापीठात अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्राचार्यांची कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी परीक्षा मंडळ सभागृहात बैठक झाली. परीक्षा नियंत्रक डॉ. नेटके म्हणाले, अभियांत्रिकी व फार्मसी प्रथम वर्षाचे निकाल १५ जूनपूर्वीच लावण्यात यावेत, असे तंत्रशिक्षण संचालक डॉ. सुभाष महाजन यांनी पत्राद्वारे कळविले आहे. या अनुषंगाने परीक्षा विभागातर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रथम वर्षाचे निकाल २० जूनपर्यंत तर उर्वरित सर्व निकाल १५ जुलैपर्यंत घोषित करण्यात येतील, असेही ते म्हणाले. मूल्यांकनासाठी जास्तीत जास्त शिक्षकांना पाठवावे, असे आवाहन कुलगुरूंनी केले. सर्व प्राचार्यांनी यास सकारात्मक प्रतिसाद दिला. बैठकीस माजी अधिष्ठाता डॉ. उल्हास शिंदे, मूल्यांकन केंद्रप्रमुख डॉ. सूर्यकांत जगदाळे, प्रा. एम. यू. पोपळे, कक्षाधिकारी डॉ. पंजाब पडूळ यांच्यासह २५ प्राचार्य प्रतिनिधी उपस्थित होते.