लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज शनिवारी जाहीर झाला. शहरातील बहुतांश शाळांनी आपली निकालाची यशस्वी परंपरा कायम राखली असली, तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालाची टक्केवारी घसरल्याचे जाणकारांचे मत आहे.सीबीएसईने बारावीचा निकाल २८ मे रोजी जाहीर केल्यानंतर दहावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. यंदा दहावीची परीक्षा ९ मार्च ते १० एप्रिल या कालावधीत घेण्यात आली होती. काही दिवसांतच विद्यार्थ्यांना आपल्या शाळांमध्ये गुणपत्रिका उपलब्ध होतील.दहावी परीक्षेच्या निकालाबाबतीत झालेल्या सुधारणा धोरणाच्या वादामुळे यंदा बारावी सीबीएसईचा निकालही लांबणीवर गेला होता. कॉलेजच्या हाय कट आॅफ लिस्टमुळे मॉडरेशन पॉलिसी बंद केली होती. या पॉलिसीनुसार कठीण प्रश्नांवर विद्यार्थ्यांना जादा गुण दिले जातात. मॉडरेशन पॉलिसीसंदर्भात पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने मॉडरेशन पॉलिसी कायम ठेवण्याचे आदेश दिले होते. रिव्हरडेल हायस्कूलरिव्हरडेल हायस्कूलचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या शाळेतील २३ विद्यार्थिनी व २१ विद्यार्थ्यांनी १० सीजीपीए गुण मिळवले. १३ विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयामध्ये १० सीजीपीए गुण मिळवले आहेत. शाळेतील पूर्णिमा द्विवेदी, अथर्व चव्हाण, श्रेया लोंढे, उदयन चव्हाण, गार्गी सावरगावकर,(पान ७ वर)
दहावी ‘सीबीएसई’चा निकाल जाहीर
By admin | Updated: June 4, 2017 00:40 IST