शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

उर्वरित आरोपींना महिनाअखेरपर्यंत अटक करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : येथील पुरवठा विभागात गतवर्षी झालेल्या धान्य घोटाळ्यातील उर्वरित ५ खाजगी आरोपींना महिनाअखेरपर्यंत अटक केली ...

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील पुरवठा विभागात गतवर्षी झालेल्या धान्य घोटाळ्यातील उर्वरित ५ खाजगी आरोपींना महिनाअखेरपर्यंत अटक केली जाईल व शासकीय अधिकाºयांच्या अटकेसंदर्भात वरिष्ठस्तरावरून येणाºया मार्गदर्शनानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती या प्रकरणाचे तपास अधिकारी तथा हिंगोलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़परभणीतील पुरवठा विभागाच्या गोदामातून ४ कोटी ९५ लाख रुपयांचे धान्य गायब झाल्या प्रकरणात १३ आॅगस्ट २०१६ रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता़ पोलीस तपासात धान्य अपहराची रक्कम २८ कोटींपर्यंत गेली़ आरोपींची संख्या दोनवरून ३७ पर्यंत गेली़ या प्रकरणातील २२ आरोपींना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली असून, या सर्वच आरोपींना जामीन मिळालेला आहे़ उर्वरित १५ पैकी एका आरोपीचा मृत्यू झाला असून, १४ पैकी ९ शासकीय अधिकाºयांचा आरोपीत समावेश आहे़ इतर ५ खाजगी आरोपींनाही पोलिसांनी अटक केलेली नाही़ या प्रकरणाचा प्रारंभी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी तपास केला़ त्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्याकडे हा तपास वर्ग झाला़ त्यांच्या काळात फारशी तपासाला गती मिळाली नाही़ अशातच परभणीचे तहसीलदार कडवकर व पानसरे यांच्यात खा़ राहुल गांधी यांच्या दौºयाच्या वेळी वादावादी झाली़त्यामुळे पानसरे यांनी हा तपास आपल्याकडून काढून घ्यावा, अशी नांदेड येथील विशेष पोलीस महानिरीक्षकांना मागणी केली़ त्यानुसार हे प्रकरण तपासासाठी हिंगोलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्याकडे आॅक्टोबर महिन्यात सोपविण्यात आले़ या अनुषंगाने गुंजाळ यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, या प्रकरणात परभणी जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी बाजार समिती, विभागीय आयुक्त कार्यालय आदींकडून काही माहिती आवश्यक होती़ ती माहिती मागविण्यात आली आहे़ अन्यही काही पुराव्यांची जमवाजमव केली जात आहे़ या प्रकरणातील ५ खाजगी आरोपींना नोव्हेंबर अखेरपर्यंत अटक केली जाईल़ ९ शासकीय अधिकाºयांच्या अटकेसंदर्भात वरिष्ठ पातळीवरून ज्या काही सूचना येतील, त्यानुसार कारवाई केली जाईल, असे गुंजाळ यांनी सांगितले़ त्यामुळे आता गुंजाळ यांच्या चौकशीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे़