शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
3
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
4
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
5
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
6
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
7
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
8
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
9
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
10
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
11
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
12
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
13
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
14
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
15
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
16
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
17
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
18
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
19
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
20
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार

पक्षीसंवर्धन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी

By admin | Updated: January 7, 2017 23:03 IST

अंबाजोगाई :‘यस’ संघटनेच्या वतीने ७ व ८ जानेवारी रोजी ३० वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन येथील एका मंगल कार्यालयात सुरू आहे.

अंबाजोगाई : मराठवाडयात व महाराष्ट्राला सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागतो. अशा प्रतिकूल परिस्थितीत पक्षांचे संवर्धन व संगोपन करण्याची मोठी जबाबदारी पक्षीमित्रांवर आहे. या कामासाठी पक्षीमित्रांनी पुढाकार घेऊन विविध पक्षांचे संगोपन करावे, असे आवाहन पर्यावरण अभ्यासक विजय दिवाण यांनी केले. ‘यस’ संघटनेच्या वतीने ७ व ८ जानेवारी रोजी ३० वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन येथील एका मंगल कार्यालयात सुरू आहे. शनिवारी सकाळी उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होेते.अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा रचना मोदी होत्या. व्यासपीठावर २९ व्या संमेलनाचे अध्यक्ष शरद आपटे, विभागीय वनाधिकारी अमोल सातपुते, स्वागताध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, चंद्रशेखर वडमारे, ‘यस’ संघटनेचे अध्यक्ष रत्नाकर निकम, सचिव शंकर कराड उपस्थित होते. यावेळी दिवाण म्हणाले की, महाराष्ट्राचा जलविकासात प्रथम क्रमांक लागत असून आजही १६६ तालुके व ११ हजार खेडी दुष्काळाच्या झळा तीव्रतेने सहन करीत आहेत. याचा मोठा परिणाम प्राणी व पक्षी यांच्या जीवनावर होतो. मराठवाडयात तर पाणीतूट व पर्जन्यमान अस्थिर असल्यामुळे ७६ तालुक्यांपैकी ६१ तालुक्यांची पाणीपातळी अत्यंत खालवलेली आहे. अशा स्थितीत वृक्ष लागवड व पक्षीसंवर्धन करणे हे मोठ्या जिकीरीचे काम आहे.शरद आपटे म्हणाले की, केवळ पक्षांचे निरीक्षणच न करता पक्षांच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना या संमेलनात आखल्या जाव्यात पक्षीमित्रांची संख्या वाढवून पर्यावरण व वृक्षारोपण जोपासण्यासाठी सामुहिक पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. वनाधिकारी सातपुते यांनी घुबड, गिधाड, टिवटिवी या पक्ष्यांना अंधश्रद्धेपोटी अशुभ मानले जाते. पर्यावरणातील महत्त्व समाजासमोर मांडल्याशिवाय पक्षांबद्दलची आस्था समाजात निर्माण होणार नाही. पक्षी वृद्धींगत करण्यासाठी वनविभाग पक्षीमित्रांसोबत राहिल, अशी ग्वाही त्यांनी दिली. चंद्रशेखर वडमारे, नगराध्यक्षा मोदी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. शुभदा लोहिया यांनी केले. आभार शंकर कराड यांनी मानले. संमेलनासाठी महाराष्ट्रातून पक्षीमित्र दाखल झाले आहेत. संमेलनासाठी यस संघटनेचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. (वार्ताहर)