शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

अतिक्रमणांना मनपाच जबाबदार

By admin | Updated: September 15, 2015 00:36 IST

अशोक कारके , औरंगाबाद महापालिका प्रशासन आणि १३ लाख नागरिक गेल्या काही महिन्यांपासून ‘स्मार्ट औरंगाबाद’चे स्वप्न पाहत आहेत. याच स्वप्नातील औरंगाबादमध्ये

अशोक कारके , औरंगाबादमहापालिका प्रशासन आणि १३ लाख नागरिक गेल्या काही महिन्यांपासून ‘स्मार्ट औरंगाबाद’चे स्वप्न पाहत आहेत. याच स्वप्नातील औरंगाबादमध्ये आजघडीला अनेक समस्या आहेत. त्यातील मुख्य समस्या म्हणजे शहरातील अरुंद आणि खड्डेमय रस्ते. मनपाने याच अरुंद रस्त्यांपैकी जयभवानीनगर, शिवाजी चौक ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन रस्त्यांवरील अतिक्रमणांवर नुकतीच कारवाई केली आहे. या कारवाईत अनेकांची घरे भुईसपाट झाली आहेत. या मोहिमेनंतर प्रशासनाने ५० रस्त्यांची मार्किंग केली असून, याच पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने ‘शहरातील रस्त्यावरील अतिक्रमण आणि मनपाची कारवाई’ याविषयी सर्वेक्षण केले असता, या सर्वेक्षणात रस्त्यावरील ‘अतिक्रमणाला मनपाच जबाबदार’ असल्याचे मत ७६ टक्के औरंगाबादकरांनी व्यक्त केले आहे.महापालिकेने जयभवानीनगर, शिवाजी चौक ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली आहेत. याचदरम्यान न्यायालयाच्या आदेशाने महसूल विभागाने मकबरा परिसरातील रेणुकामातानगर येथेही कारवाई केली. त्यामध्ये हक्काची घरे असणाऱ्या नागरिकांना बेघर व्हावे लागले. यानंतर मनपाने शहरातील ५० रस्त्यांचे मार्किंग केले. या मार्किंगमध्ये अनेकांची घरे तुटणार हे निश्चित झाल्यामुळे शहरातील वातावरण चांगलेच ढवळले होते. याच पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात ‘अतिक्रमणास जबाबदार असणाऱ्या भूखंड माफियांवर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी’, असे मत ८० टक्के नागरिकांनी व्यक्त केले, तर मनपाच्या रस्ता रुंदीकरण मोहिमेला ६६ टक्के नागरिकांनी पाठिंबा दिला आहे. २४ टक्के नागरिकांनी मोहिमेशी सहमत नसल्याचे म्हटले आहे. १० टक्के नागरिकांनी काही प्रमाणात पाठिंबा असल्याचे सर्वेक्षणात मत व्यक्त केले आहे, तर शहरातील ‘अतिक्रमणाला मनपा प्रशासन जबाबदार आहे’, असे मत ७६ टक्के नागरिकांनी सर्वेक्षणात मांडले आहे, तर १८ टक्के नागरिकांनी मनपा जबाबदार नसल्याचे म्हटले.