हिंगोली : ‘सखीमंच’तर्फे ६ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या रांगोळी आणि पूजेची थाळी सजावट स्पर्धेस उत्तम प्रतिसाद मिळाला. शहरातील केमिस्ट भवन येथे दुपारी ३ वाजता झालेल्या स्पर्धेत सखींनी सहभाग घेतला.कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून जि.प. सदस्या रूपाली पाटील, शीला देवडा, नगरसेविका वसंताबाई लुंगे, विद्याताई मस्के, दीपक अग्रवाल, क्रिष्णा रूहटीया यांची उपस्थिती होती. पूजेची थाळी सजावट स्पर्धेत अनुक्रमे प्रेरणा पातूरकर, अनिता बिर्ला, वर्षा देशमुख, प्रज्ञा पैैठणकर, स्वाती भाले यांनी बाजी मारली. रांगोळीत मंजुषा मुळे, वंदना निधनकर, संजीवनी मस्के, वर्षा देशमुख, जयश्री गायकवाड यांनी पारितोषिके पटकाविली. परीक्षक म्हणून कीर्ती केडिया, संगीता चौधरी, प्रा. निखिल कांबळे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन सुभाष नानवटे यांनी केले. यासाठी रजनी पाटील, विद्या पवार, अर्चना जाधव परिश्रम घेतले. स्पर्धेचे प्रायोजकत्व हिंगोली जिल्हा डान्स अकॅडमीकडे होते.
रांगोळी, पूजेची थाळी सजावट स्पर्धेस प्रतिसाद
By admin | Updated: September 7, 2014 00:27 IST