जालना : लोकमत सखी मंच आणि जया कॉस्मेटिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने सखी मंच सदस्यांसाठी ३० जून रोजी रांगोळी, नववधू मेकअप, मेहंदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला सखी मंच सदस्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला. महिलांनी सादर केलेल्या कलाकृती उपस्थितांचे आकर्षण ठरल्या.लोकमत सखी मंच सदस्यांसाठी नियमित स्पर्धा तसेच कार्यक्रम राबविण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून सोमवारी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जुना जसेच नवीन जालना भागातील सखी मंच सदस्यांनी या स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिला. या स्पर्धेबद्दल सखी मंच सदस्यांची समाधान व्यक्त केले. जुना जालना भागातील खेरूडकर मंगल कार्यालयात सायंकाळी ४ वाजेपासून स्पर्धांना सुरूवात झाली. महिलांनी रांगोळी, मेहंदी व नववधू मेकअप स्पर्धेत सहभाग नोंदवून आपले नैपूण्य सादर केले. दुष्काळ, राधाकृष्ण, निसर्ग, विविध देवता रांगोळींमधून साकारण्यात आल्या. यावेळी परीक्षक म्हणून संतोष जोशी, सुनीती मदन यांनी काम पाहिले. रांगोळी स्पर्धेत प्रथम विजेती तृप्ती जडिया, द्वितीय सुरभी कल्याण तर श्रद्धा नाईक यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. ज्योती ढाकरे यांनी उत्तेजनार्थ बक्षीय मिळविले.मेहंदी स्पर्धेत स्वाती भराटे प्रथम, द्वितीय मृणाली राजेकर तर सुनंदा पारख यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.विशाखा वाहुळे यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. मेकअपमध्ये नेहा चौहाण प्रथम, हर्षदा पैठणकर द्वितीय तर सुचिता चिंधे यांनी तृतीय क्रमांक मिळविला.सहभागी सदस्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. तर जया कॉस्मेटिक्सच्या वतीने विजेत्या र्स्धकांना भेटवस्तू देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी रवींद्र देशपांडे यांनी हॉल उपलब्ध करुन दिला. दीपक वासवाणी हे बक्षिसांचे प्रायोजक होते. स्पर्धेतील सहभागी सखी मंच सदस्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या. ललीता पावटेकर म्हणाल्या, स्पर्धेत सहभाग घेवून अतिशय आनंद झाला. अशा स्पर्धांमुळे महिलांच्या कलागुणांना वाव मिळतो. एक व्यासपीठ मिळते. (प्रतिनिधी) चैताली शहाणे म्हणाल्या, एक अविस्मरणीय क्षण आहे. सर्वच महिलांनी रांगोळी, मेकअप, मेहंदी स्पर्धेत आकर्षक कला सादर केल्या.
रांगोळी स्पर्धेस संखी मंच सदस्यांचा प्रतिसाद
By admin | Updated: July 1, 2014 01:05 IST